Dr Pathan giving goods on eve of Diwali Festival esakal
नाशिक

Nashik: अन् वस्तीवरच्या गरोदर स्त्रीची नॉर्मल डिलिव्हरी करून त्यांनी दिले मुलीला जीवदान

माणिक देसाई

निफाड (जि. नाशिक) : तालुक्यातील वनसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे समुदाय आरोग्य अधिकारी पदावर कार्यरत असणारे डॉ कलीम पठाण यांनी दिवाळीनिमित्त आपल्या सहकाऱ्यांसोबत वनसगाव-ब्राह्मणगाव रस्त्यावरील वस्त्यांवर लहान मुलांना नवीन कपडे, फराळ, आणि फटाके वाटत होते. (normal delivery of pregnant tribal women by dr kalim pathan Nashik Latest Marathi News)

यातच एका झोपडीत शिरल्यानंतर डॉ पठाण यांनी दिपाली महाले (वय 24) गरोदर स्त्रीला विव्हळताना पाहिले, यावेळी त्यांनी १०८ रुग्णवाहिकेला फोन करून याबद्दल माहिती दिली, रुग्णवाहिका येण्यासाठी वेळ लागणार होता तेव्हा डॉ कलीम पठाण यांनी डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला.

डिलिव्हरी झाल्यानंतर या मातेने एका गोंडस बाळाला जन्म दिला खरा परंतु बाळ जन्मल्यानंतर त्याची कोणतीही हालचाल नव्हती या बाळाच्या गळ्यात नाळेचा वेढा अडकल्याने बाळाचा श्वासोच्छ्वास काही काळ बंद झाला होता तेव्हा डॉ पठाण यांनी कृत्रिम श्वासोच्छ्वास देत सिपीआर देत बाळाचे प्राण वाचवले, तेव्हा सगळ्यांनाच आनंद झाला.

यानंतर बाळ आणि माता यांना उपजिल्हा रुग्णालय निफाड येथे डॉ कलीम पठाण यांनी संदर्भित केले डॉ कलीम पठाण आरोग्य सेवक गोरक्षनाथ ताजणे, आशा कार्यकर्ती सविता कोकाटे यांच्याकडून माणुसकीचे अनोखं दर्शन घडल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.

डॉ कलीम पठाण आणि त्यांचे सहकारी मित्र हे ब्राह्मणगाव येथील वस्तीवर असणाऱ्या मुलांना दिवाळी निमित्त नवीन कपडे, फराळ आणि फटाके घेवून गेले होते अशातच या बाळाचा जन्म झाल्याने त्यांनी आणलेल्या नवीन कपड्यांपैकी एक ड्रेस लगेच बाळाला घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsvardhan Sapkal : 'निवडणूक आयोग सरकारच्‍या हातचे बाहुले बनले आहे'; हर्षवर्धन सपकाळ यांची भाजप आणि आयोगावर तोफ

IND vs SA 2nd ODI : भारताच्या Playing XI मध्ये बदल होणार, वॉशिंग्टन सुंदरच्या जागी तगडा ऑलराऊंडर दिसणार किंवा...

माेठी बातमी! 'पाथर्डीच्या उपअभियंत्याची क्लिप विधानसभेत':आमदार काशिनाथ दातेंची लक्षवेधी; अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ

Kolhapur : सोलर पाईपचा विद्युत तारेला स्पर्श; घरमालकाचा मृत्यू, मदतीस आलेल्याही शॉक लागला अन्! कोल्हापुरातील धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट; ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT