nmc.jpg 
नाशिक

त्या 'रॅपिड किट'शी भाजपचा काहीएक संबंध नाही; सभागृहनेत्याचे स्पष्टीकरण

विक्रांत मते

नाशिक : महापलिका क्षेत्रात रॅपिड ॲन्टिजन किटचा तुटवडा भासत असताना जळगाव महापालिकेला दिलेल्या अठरा हजार किटवरून राजकीय वातावरण तापले आहे. जळगाव महापालिकेकडून परत किट मागविणे अपेक्षित असताना भाजपकडून शासनाकडे मागणी केली जात आहे, तर शिवसेनेने शासनाऐवजी जळगावहून किट मागवाव्यात, अशी मागणी करत माजी पालकमंत्र्यांवर निशाणा साधला. त्याला उत्तर देताना सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी जळगावला भाजपने नव्हे, तर प्रशासनाने मानवी दृष्टिकोनातून किट दिल्याचे सांगितले. 

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांचा आरोप

शहरातत रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किटचा तुटवडा भासत असताना आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी शासनाकडे किटची मागणी केली. परंतु जळगाव महापालिकेसाठी यापूर्वी देण्यात आलेल्या अठरा हजार किटसाठी माजी पालकमंत्र्यांचा दबाव होता का, असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी करून किटच्या तुटवड्याला भारतीय जनता पक्षच जबाबदार असल्याचा आरोप केला. 

सभागृहनेते सतीश सोनवणे यांचे स्पष्टीकरण 

शासनाने महापालिकेला रॅपिड ॲन्टिजन किट देण्याची मागणीही केली. जळगाव महापालिकेकडून किटची मागणी करण्यात आली. त्या वेळी मानवी दृष्टिकोनातून किट देण्यात आले. त्यात भाजपचा किंवा माजी पालकमंत्र्यांचा काहीएक संबंध नाही. प्रशासनाने अठरा हजार किट परत देण्याच्या बोलीवर दिल्या होत्या. त्या अद्याप मिळाल्या नाहीत, त्यामुळे 'मिशन नाशिक झीरो' अभियानाला खीळ बसली असून, शासनाने नाशिकला किट उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी श्री. सोनवणे यांनी केली आहे.

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सचिन तेंडुलकरने सर्वांचे आयुष्य उद्ध्वस्थ केले, टेंशन दिले"; Kapil Dev असे का म्हणाले? विराट कोहलीबद्दलही विधान...

Share Market: शेअर मार्केट Crash मध्येही हे 10 शेअर्स ठरले धुरंधर! आठवड्यात 40% रिटर्न; तुमच्याकडे आहेत का?

'ठरलं तर मग'च्या सुमन काकूंना खऱ्या आयुष्यात आहे 'हा' गंभीर आजार; म्हणाल्या- दिग्दर्शकाने हाक मारली तरी...

Latest Marathi News Live Update : सिनेमागृहात कर्मचाऱ्याने चाकूचा धाक दाखवून दिली धमकी

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT