2000 Rupees Note Sakal
नाशिक

2000 Rupees Note: 2 हजारांच्या नोटा घेण्यास खळखळ; नोटा स्वीकारण्याची जोखीम नकोच

सकाळ वृत्तसेवा

2000 Rupees Note : रिझर्व्ह बॅंकेने दोन हजारांच्या नोटांवर टप्प्याटप्प्याने प्रतिबंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सप्टेंबरपर्यंत नागरिकांना त्यांच्याकडील नोटा जमा करण्याचा अवधी मिळाला आहे.

मात्र आतापासून अनेक ठिकाणी नोटा घेण्यास खळखळ केली जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. (not Excited to take 2 thousand notes people Dont risk accepting notes nashik news)

प्रत्येक अधिकृत नोटेच्या देवघेव करण्याला रिझर्व्ह बॅंकेच्या गव्हर्नरची हमी असते. नोटेवर लिखित स्वरूपातच तशी हमी असल्याने कुठलीही चलनातील विधिग्राह्य नोट देण्यास किंवा घेण्यास नकार देणे हा कायद्याने गुन्हा आहे.

तसेच खुद्द रिझर्व्ह बॅंकेने सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या नोटा जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार प्रत्येक नागरिक दहा नोटा जमा करू शकतो. तसेच थेट बॅंकेत जमा करण्याऐवजी अनेकजण चलनात वापरताना दिसत आहेत.

दोन हजारांची नोट चलनात अद्याप बाद केलेली नसल्याने पेट्रोलपंपासह अनेक दुकानांत दोन हजारांची नोट स्वीकारणे बंधनकारक असल्याने चलनात वापरही होतो. मात्र काही ठिकाणी जाणीवपूर्वक अडवणूक होत असल्याच्या

तक्रारी आहेत. विशेषतः बॅंकेत नोटा घेताना खळखळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. सहकारी बॅंकांचा मागील नोटबंदीचा अनुभव फारसा चांगला नाही. एकट्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला मागील नोटबंदीत

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बाद झालेल्या जुन्या नोटा बदलून मिळालेल्या नसल्याची ओरड आहे. बहुधा अशाच भीतीतून पतसंस्थांसह लहान-लहान बॅंकांतील कर्मचारी नोटा स्वीकारण्यास खळखळ करतात. नोटा घेणार नाही, असेही स्पष्ट सांगत नाही.

पण त्याचवेळी नोटाही स्वीकारत नाही. त्यात आधार कार्डच्या झेरॉक्ससह नोटेच्या सतत्येच्या बहाण्याने नोटा स्वीकारण्याची जोखीम टाळतात, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे.

दरम्यान, बॅंकांकडे मात्र नोटा न स्वीकारण्याचे कुठलेही आदेश नाहीत. त्यामुळे कुठल्याही बॅंकेच्या यंत्रणेकडून आम्ही नोटा स्वीकारत नाही, असेच सांगितले जाते. प्रत्यक्षात अनुभव वेगळा येतो, अशी तक्रार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT