sharp weapon attack2.jpg 
नाशिक

धक्कादायक! सिगारेट न दिल्याच्या रागातून जेव्हा डोक्यात भडकली आग...अन्

सकाळवृत्तसेवा

नाशिक : कामठवाडा गावात सिगारेट न दिल्याच्या कारणातून एकावर कोयत्याने हल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प प्रयत्न केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे, प्रक्षेप अडांगळे असे संशयिताचे नाव आहे. 

अशी आहे घटना

नाजीम शहाबुद्दीन खाटीक (रा. मंथन अपार्टमेंटसमोर, कामठवाडा) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या गुरुवारी (ता, 9) मध्यरात्रीच्या सुमारास ते त्यांच्या घरात झोपलेले होते. त्यावेळी त्यांच्या ओळखीतील संशयित प्रक्षेप अडांगळे याने खाटीक यांचे घराचे दार ठोठवले आणि त्यांच्याकडे सिगारेट मागितली खाटीक यांनी सिगारेट नसल्याचे सांगितले. त्याचाच राग संशयिताला आला त्यावेळी तो धमकावून निघून गेला. त्यानंतर तो काही संशयित साथीदारांना घेऊन परत आला. यावेळी त्याने पुन्हा खाटीक यांच्या घरालगतच्या दुकानाजवळ आले. त्याच्याकडे कोयता तर साथीदारांकडे लाकडी दांडे होते. खाटीक यांनी दुकानात सिगारेट नसल्याचे सांगितले. मात्र संशयित अडांगळे यांने त्याच्याकडील कोयत्याने खाटीक यांच्या डोक्यावर वर केला असता त्यांनी तो चुकविला. तर दुसर्यांचा वार केला असता त्यांच्या हातावर बसला. यावेळी खाटीक यांचे भाऊ मोहम्मद हे मदतीसाठी धावले आणि संशयिताला रोखण्याचा प्रयत्न केला. तर संशयितांनी घरासमोर खाटीक यांची रिक्षाची (एम एच 15 झेड 270) तोडफोड केली. तसेच दुचाकी (एम एच 15 बी क्यू 7529) हिचे हेडलाइट फोडले. 

संशयितांनी सिगारेट दिली नाही म्हणून त्याला संपविण्याची भाषा करीत परिसरामध्ये दहशत पसरविली. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करून संशयित अडांगळे यास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शिंदे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : गणपतीपुळे मंदिरात १ जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

SCROLL FOR NEXT