malwadi notes_0.jpg
malwadi notes_0.jpg 
नाशिक

हूश्श! नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...अखेर 'त्या' नोटाचं उकललं गूढ

सकाळवृत्तसेवा

नाशिक/ दहीवड : माळवाडी (ता. देवळा) येथील धवळखडी मंदिर रस्त्यावर शंभर, दोनशेच्या एकूण दोन हजार रुपयांच्या नोटा आढळल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोटा 50 ते 60 फुटांपर्यंत पसरलेल्या अवस्थेत आढळल्याने हे नेमके आहे काय, असा प्रश्‍न शेतकरी, ग्रामस्थ, शेतमजुरांसमोर उभा होता मात्र त्या नोटांच गूढ उकलल्याने परिसरातील नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला. 

त्या नोटांच गूढ उकलले

माळवाडी येथील धवळखडी वस्तीजवळील मारुती मंदिराच्या रस्त्यालगत शंभर, दोनशेच्या चलनी नोटा काल (ता. ३०) रोजी आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये शंकेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले असतांना आज अखेर देवळा पोलिसांनी कसून चौकशी करत रस्त्यावर पडलेल्या नोटा कांदा विक्री करण्यासाठी गेलेल्या खालप येथील शेतकऱ्याच्या असल्याची माहिती दिली. त्या नोटांच गूढ उकलल्याने परिसरातील नागरिकांना सुटकेचा निश्वास सोडला. त्या नोटा एका शेतकऱ्याच्या असून खिशातून मोबाईल काढताना त्या पडल्या असल्याची माहिती देवळा पोलिसांनी दिली.
 देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार खालप (ता.देवळा) येथील यशवंत रमेश सूर्यवंशी हे शेतकरी कांदा विक्रीसाठी पिंपळगाव बसवंत येथे गेले होते. कांदा विक्री करून परतत असताना सूर्यवंशी यांना आपल्या मोबाईलवर फोन आल्याचे जाणवले.

शहानिशा करून केले पैसे परत

खिशात असलेला मोबाईल काढताना सूर्यवंशी यांच्या खिशातील काही पैसे रस्त्यावर पडले. घरी आल्यावर सूर्यवंशी यांनी खिशातील पैसे पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या खिशातील काही रक्कम रस्त्याने पडली असावी. त्यांनी ट्रॅक्टरवरती पाहिले असता ट्रॅक्टर वर काही नोटा अडकून होत्या. दरम्यान रस्त्यावर नोटा आढळून आल्याची बातमी सर्वत्र पसरल्या त्यांच्या लक्षात आले की त्या नोटा आपल्याच आहेत. त्यांनी तत्काळ देवळा पोलीस स्टेशन गाठत पोलिसांना विक्री केलेल्या कांद्याची पावती दाखवून पुरावा देत त्या नोटा आपल्याच खिशातून पडल्याचे त्यांनी सांगितलं या बाबत घटनेची शहानिशा करून देवळा पोलिसांनी सूर्यवंशी यांचे पैसे त्यांना परत केल्याची माहिती राठोड यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; देशपांडेने दुसऱ्याच षटकात दिले दोन धक्के

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT