VBA 
नाशिक

वंचितच्या आंदोलनचा प्रशासनाने घेतला धसका! राज्यपालांच्या दौऱ्यापूर्वी पदाधिकाऱ्यांना नोटिसा 

रोशन खैरनार

सटाणा (जि. नाशिक)  : राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. 

उद्या होणार होतं आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रवक्ते अमोल बच्छाव म्हणाले, की शहरातील सांडपाण्याचा प्रश्न, अनुसूचित जाती-जमाती, दलित वस्ती सुधार योजनेच्या कामांमधील नियमितता, सिद्धार्थनगर परिसरात असणाऱ्या शौचालयांमुळे तेथील नागरिकांच्या आरोग्यावर होणारा विपरित परिणाम, शहरात आवश्यक असणारी अभ्यासिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संकुलातील अतिक्रमण, डुकरे-कुत्रे-मोकाट जनावरांचा उपद्रव आदी विषयांसाठी सटाणा पालिका प्रशासनास वेळोवेळी निवेदने दिली. मात्र सुस्त प्रशासनास नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर काही देणं-घेणं नाही. त्यामुळे उद्या राज्यपाल महोदयांच्या दौऱ्याप्रसंगी महात्मा गांधी पुतळ्यासमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्याचे ठरविले होते.

...आम्ही कधीही थांबविणार नाही

मात्र प्रशासनाने आमच्या आंदोलनाचा धसका घेतल्याने आंदोलनाच्या पूर्वसंध्येला आघाडीचे माझ्यासह तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव, तालुका महासचिव दादा खरे यांना प्रशासनाने क्रिमिनल प्रोसिजर कोड अन्वये नोटिसा जारी केल्या आहेत. अशा पद्धतीने कितीही मुस्कटदाबी होत राहिली तरी नागरिकांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याचे आम्ही कधीही थांबविणार नाही. लोकहितासाठी कायमस्वरूपी सक्रिय राहू, असा इशाराही प्रा. बच्छाव यांनी या वेळी दिला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Resignation : क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब? अजित पवार–फडणवीस भेटीने खळबळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील रितेशचा फस्ट लूक समोर, वाढदिवसादिवशी पोस्ट करत म्हणाला, 'क्षणभर थांबलेला सूर्य आणि...'

Ind vs SA 4th T20 : मालिका विजयासाठी भारताला विजय आवश्यक; सॅमसनला आज तरी मिळेल का संधी? कशी असेल प्लेईंग XI?

VIDEO : 15 वर्षांच्या संसाराचा अंत? हॉटेलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबत पत्नी सापडली रंगेहाथ; पती रडत रडत म्हणाला, 'दुपारी ३:३० च्या सुमारास..'

Chandrashekhar Bawankule: नागपूरसह राज्यात महायुती मजबूत : चंद्रशेखर बावनकुळे; ५१ टक्क्यांहून अधिक मतांसह महायुती सत्तेत येईल!

SCROLL FOR NEXT