corona-1.jpg 
नाशिक

Coronaupdate : जिल्ह्यात ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत होतेय वाढ; मात्र दुसरीकडे कोरोनामुक्‍ताची संख्याही दिलासादायक

अरुण मलाणी

नाशिक : गेल्‍या काही दिवसांपासून दिलासादायक स्‍थिती असताना शनिवारी (ता. २२) कोरोनाबाधितांच्‍या संख्येत लक्षणीय वाढ झाली. दिवसभरात ९१२ कोरोनाबाधित आढळून आल्‍याने आतापर्यंतच्‍या बाधितांची संख्या २९ हजार ३३५ झाली आहे. ४१२ रुग्‍णांनी कोरोनावर मात केल्‍याने बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या २३ हजार ७७७ इतकी झाली आहे. 

दोन हजार ६३१ ॲक्टिव्‍ह रुग्‍ण

ॲक्टिव्‍ह रुग्‍णांच्या संख्येत पाचशेने वाढ झाली असून, चार हजार ७९७ बाधित उपचार घेत आहेत. सहा रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याने मृतांचा आकडा ७६१ झाला आहे. शनिवारी आढळलेल्‍या ९१२ कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक ६२९ नाशिक शहरातील, २५२ नाशिक ग्रामीण, २९ मालेगाव, तर दोन जिल्‍हाबाह्य रुग्‍णांचा समावेश आहे. बरे झालेल्‍या ४१२ रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील १५०, नाशिक ग्रामीणचे २२५, मालेगावच्‍या ३७ रुग्‍णांचा समावेश आहे. नाशिक शहरात आढळलेल्‍या १९ हजार ७१२ कोरोनाबाधितांमध्ये १६ हजार ६५५ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, दोन हजार ६३१ ॲक्टिव्‍ह रुग्‍ण सध्या उपचार घेत आहेत. 

नाशिक ग्रामीणमध्ये आढळलेल्‍या पाच हजार ४९० रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, एक हजार ४८७ रुग्‍ण सध्या उपचार घेत आहेत. मालेगाव महापालिका हद्दीत सापडलेल्‍या दोन हजार २३३ रुग्‍णांपैकी एक हजार ४६१ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, ६६९ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. 
शनिवारी मृत्यू झालेल्‍या सहा रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील दोन, ग्रामीणचे तीन, मालेगाव महापालिकाहद्दीतील एका रुग्‍णाचा समावेश आहे. 

दिवसभरात नाशिक महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ५३१, नाशिक ग्रामीण व गृहविलगीकरणात २१०, मालेगाव महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात ७२ आणि डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात २०, जिल्‍हा रुग्‍णालयात नऊ संशयित दाखल झाले आहेत. एक हजार ३५७ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

World Youngest Billionier : वयाच्या 22 व्या वर्षी अब्जाधीश! भारतीय वंशाच्या दोन तरुणांसह तीन मित्रांची अविश्वसनीय कामगिरी

Nashik News : कोवळ्या वयासाठी 'बोल्ड' विषय नको! नाट्य संघांच्या मागणीनुसार हौशी मराठी नाट्यस्पर्धेत लहान मुलांना प्रवेश नाही

Dev Deepawali 2025 Travel Tips : देव दिवाळीला वाराणसीला जाऊ शकत नाही? मग भेट द्या 'या' अद्भुत ठिकाणांना

SCROLL FOR NEXT