corona updates nashik 
नाशिक

दिवसभरात दाखल रुग्‍णांची संख्या पुन्‍हा हजारच्‍या घरात; बरे झाले ४१७ रुग्‍ण

अरुण मलाणी

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लक्षणे जाणवणारे किंवा संशयित रुग्‍णांना रुग्‍णालयात अथवा गृहविलगीकरणात दाखल केले जात असते. दीर्घ कालावधीनंतर रविवारी (ता. २०) नाशिक शहरातील महापालिका रुग्‍णालये व गृहविलगीकरणात दाखल रुग्‍णांची संख्या दिवसभरात एक हजारहून अधिक राहिली. दरम्यान, जिल्ह्यात दिवसभरात ३२४ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला असून, बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या ४१७ होती. तर पाच रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. यातून ॲक्टिव्‍ह रुग्‍णसंख्येत ९८ ने घट झाली असून, सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात दोन हजार ७६७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक शहरातील १४९ बाधित

रविवारी आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील १४९, नाशिक ग्रामीणमधील १५८, मालेगावला दहा, तर जिल्‍हाबाहेरील सात रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. बरे झालेल्‍या रुग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ३३७, नाशिक ग्रामीणमधील ६५, मालेगावचे अकरा, तर जिल्ह्याबाहेरील चार रुग्‍णांचा समावेश आहे. पाच मृतांमध्ये नाशिक शहरातील तीन, तर ग्रामीण भागातील दोघांचा समावेश आहे. शहरात गंगापूर रोड, पंपिंग स्‍टेशन परिसरातील ७० वर्षीय पुरुष, तसेच, जेल रोडवरील ६९ वर्षीय महिला, भाभानगरच्‍या नवशक्‍ती चौकातील ५२ वर्षीय पुरुष रुग्‍णाचा मृत्‍यू झाला. तर ग्रामीण भागात सिन्नरच्‍या ८० वर्षीय महिला, दिक्षी (ता. निफाड) येथील ६० वर्षीय पुरुष रुग्‍णाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

एकूण संख्या एक लाख सात हजार २३३

दरम्‍यान, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या एक लाख सात हजार २३३ झाली असून, यापैकी एक लाख दोन हजार ५५७ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ९०९ रुग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. दिवसभरात दाखल रुग्‍णांमध्ये नाशिक महापालिका हद्दीतील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात एक हजार २१, नाशिक ग्रामीण रुग्‍णालये व गृहविलगीकरणात २३, मालेगावला चार, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच, जिल्‍हा रुग्‍णालयात दोन रुग्‍ण दाखल झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ६३७ रुग्‍णांचे अहवाल प्रलंबित होते. यापैकी ४४१ अहवाल नाशिक शहरातील असून, नाशिक ग्रामीणमधील ११४, मालेगावच्‍या ८२ रुग्‍णांना अहवालाची प्रतीक्षा होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT