corona test 1_1.jpg 
नाशिक

Coronaupdates : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच...कोरोनाबाधितांची आकडा आठ हजार ७३९ वर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून साधारणत: चार दिवसांत हजार रुग्णसंख्येचा टप्पा गाठणाऱ्या कोरोनाने शुक्रवारी (ता. १७) कहरच केला. एकाच दिवसात तब्बल ५७४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हावासीयांचे धाबे दणाणले आहे. त्यातच, संशयित रुग्णांचे प्रमाणही वाढतच असून, जिल्ह्यात दिवसभरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाबाधितांची संख्या आठ हजार ७३९ वर

शुक्रवारी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ३६६ रुग्ण नाशिक शहरातील आहेत. आतापर्यंत एका दिवसात आढळलेली ही सर्वाधिक रुग्णसंख्या असून, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आठ हजार ७३९ वर पोचली आहे. दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत तब्बल एक हजार ४१५ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंत पाच हजार ७२३ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत. तर, दोन हजार ५८८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शुक्रवारी नाशिक शहरापाठोपाठ ग्रामीण भागातही १३१, मालेगाव महापालिका क्षेत्रात सात, तर अन्य जिल्ह्यांतील ४३ रुग्ण आढळले, तर सहा रुग्णांच्या मृत्यूमुळे कोरोनाबळींची संख्याही ३७१ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये नाशिकच्या अंबिकानगर येथील ७३ वर्षीय वृद्ध पुरुष आणि ग्रामीण भागातील तीन व मालेगाव महापालिका हद्दीतील एकाचा, तसेच जिल्ह्याबाहेरील एका रुग्णाचा समावेश आहे. 

संशयित रुग्णांचे वाढते प्रमाण चिंताजनक 

एकीकडे कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असताना, संशयित रुग्णांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ होत आहे. दिवसभरात शहरातील एक हजार १५० रुग्णांसह ग्रामीण भागातील १७२, मालेगाव महापालिका क्षेत्रात १५, गृहविलगीकरणात ७८ असे एकूण एक हजार ४१५ संशयित रुग्ण आढळले, तर उपचार घेऊन बरे झालेल्या ३२९ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या दोन हजार ५८८ कोरोनाबाधितांसह एकूण चार हजार ३८६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. 

मालेगावमध्ये पुन्हा १३ रुग्ण
 
शहर व परिसरात शुक्रवारी पुन्हा १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानुसार सौंदाणे, दहिवाळ, येसगाव या गावांमध्ये कोराेनाचा शिरकाव झाला आहे. यात आठ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. बोलठाण येथील २४ वर्षीय तरुण वगळता उर्वरित रुग्ण शहर व परिसरातील आहेत. दरम्यान, येथील प्रसिद्ध जामा मशिदीत दुपारी नमाजपठणासाठी गर्दी होत असल्याचे लक्षात येताच बंदोबस्तावरील पोलिसांनी वरिष्ठांना कळविले. त्यानंतर किल्ला व शहर पोलिसांनी मुस्लिम बांधवांची समजूत काढत त्यांना माघारी फिरण्यास सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

IND vs WI 1st ODI : सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला, आता विराट कोहली म्हणतो, माझं लक्ष...

Stock Market Today: शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स 850 अंकांनी कोसळला, निफ्टीही 23 हजारांखाली; कोणते शेअर्स घसरले?

SCROLL FOR NEXT