corona nashik.png 
नाशिक

चिंताजनक! जिल्ह्याला कोरोनाची मगरमिठी...बळींची संख्या साडेतीनशेच्या उंबरठ्यावर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : जिल्हाभरातील ११७ कोरोनाबाधितांना मंगळवारी (ता. १४) डिस्चार्ज देण्यात आला. त्याचवेळी दिवसभरात आणखी १८५ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात तब्बल १७४ रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. तर, दिवसभरात शहरातील सहा रुग्णांसह एकूण आठ जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबळींची संख्या ३४९ झाली आहे. तर, कोरोनाबाधितांची संख्या सात हजार ४४४ आहे. 

दिवसभरात १८५ अहवाल पॉझिटिव्ह

शहरातील नाशिक रोड, जेल रोड आणि पंचवटी परिसर सध्या कोरोनाचे नवीन हॉटस्पॉट ठरत असून, मंगळवारच्या पॉझिटिव्ह अहवालांमधील बहुतांश रुग्ण हे याच भागातील आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत दिवसभरात ६५८ संशयित रुग्ण नव्याने दाखल झाले आहेत. यापैकी ३६० जण नाशिक शहरातील, २५७ ग्रामीण भागातील, तर मालेगाव महापालिका हद्दीतील १५ रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे, कोरोनाबाधितांच्या संख्येबरोबरच प्रलंबित अहवालांचीही संख्या वाढत आहे. तर, मंगळवारी आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यात पंचवटी परिसरातील ७८ वर्षीय पुरुष, पाटीलनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, जुने नाशिक परिसरातील ७२ वर्षीय वृद्ध, नारायण बापूनगर येथील ६३ वर्षीय पुरुष, जेल रोड येथील ५४ वर्षीय पुरुष, चेहेडी येथील ४० वर्षीय पुरुष.

तसेच ग्रामीण भागात नांदूर गावातील ३८ वर्षीय महिला, मुल्हेर (ता. बागलाण) येथील ८२ वर्षीय पुरुषाचाही उपचार सुरू असताना मृत्यू झाला. आतापर्यंत शहरात १८१, ग्रामीण भागात ७५, तर मालेगाव महापालिका हद्दीत ७९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, बरे झालेल्या रुग्णांची संख्या चार हजार ९६६ आहे. सद्यःस्थितीत दोन हजारांहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT