corona-covid19.jpg 
नाशिक

Coronaupdate : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा ११ हजार २७४ वर...तर 'इतके' रुग्ण कोरोनामुक्त

अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्ह्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्‍णांची संख्या वाढत असल्‍याचे समाधानकारक चित्र आहे. शुक्रवारी (ता. २४) दिवसभरात ३०५ नवीन रुग्‍ण आढळून आले असताना, ३४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सहा रुग्‍णांचा मृत्‍यू झाल्याने मृतांची संख्या ४३९ झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ११ हजार २७४ झाली असून, त्यापैकी आठ हजार १४७ रुग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे.

दिवसभरात ३०५ रुग्‍ण, तर ३४९ जणांची कोरोनावर मात 
 
शुक्रवारी आढळलेल्‍या रुग्णांमध्ये शहरातील १९३, ग्रामीण भागातील ९८, मालेगाव महापालिका हद्दीतील तेरा, तर अन्य जिल्ह्यातील एका रुग्‍णाचा समावेश आहे. तसेच, कोरोनामुक्‍त झालेल्‍यांमध्येही नाशिक शहरातील २१९, ग्रामीण भागातील १०८, मालेगावचे २१ आणि अन्य जिल्ह्यातील एक रुग्ण आहे. मृत्‍यू झालेल्‍या सहा रुग्‍णांमध्ये चार नाशिक शहरातील, तर दोन ग्रामीण भागातील आहेत. सिडकोच्‍या महाराणा प्रताप चौकातील ३२ वर्षीय महिला, देवळाली कॅम्‍प येथील ७८ वर्षीय पुरुष, पंचवटीत रामवाडी येथील ६५ वर्षीय पुरुष, ओढा रोडवरील खर्जुल मळा येथील ६७ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. तर ग्रामीण भागात इगतपुरी येथील ७० वर्षीय पुरुष आणि मुल्हेर (ता. बागलाण) येथील ७८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. 

पंधराशे संशयित दाखल 

शहर परिसरात सुरू असलेल्या मोहिमेत नागरिकांच्‍या तपासण्या केल्‍या जात असल्याने प्राथमिक स्‍तरावर कोरोनाबाधितांना उपचार प्रक्रियेत दाखल करून घेतल्‍याने त्‍यांच्‍यापासून इतरांना कोरोनाची लागण होण्याची जोखीम कमी होत आहे. असे असले तरी तपासणी मोहिमेमुळे संशयित रुग्‍णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. शुक्रवारी दिवसभरात एक हजार ५४९ संशयित आढळून आले आहेत. यापैकी एक हजार २७ संशयित नाशिक शहरातील आहेत. ग्रामीण भागातील ३५२, मालेगावचे १५, तर १५५ संशयित गृहविलगीकरणात आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत ९५४ अहवाल प्रलंबित होते. 

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT