corona  google
नाशिक

मालेगाव तालुक्यात रुग्णसंख्या कमी! मृत्यूचे थैमान मात्र सुरूच

शहर व परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Positive Patients) संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.

प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरातील कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Positive Patients) संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मेच्या पहिल्या आठवड्यात शहर व तालुक्यातील रुग्णसंख्या कमी झाल्याची बाब दिलासादायक असली तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे थैमान मात्र सुरूच आहे. मेच्या पहिल्या सप्ताहात शहरात २७, तर तालुक्यात सहा अशा एकूण ३३ बाधितांचा कोरोनाने बळी गेला. मृतांत तरुण व मध्यमवयीन बाधितांचा समावेश असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. (number of corona patients in Malegaon city area is decreasing)

एप्रिलच्या पंधरा दिवसांच्या तुलनेत मेमधील शहर व तालुक्यातील रुग्णसंख्येत घट झाली आहे. १ ते ७ मेदरम्यान शहरात ३६२, तर तालुक्यात २९० कोरोनाबाधित रुग्ण मिळून आले. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण गंभीर आहे. चाळिशी, पंचेचाळिशीच्या आतील कोरोनाबाधितांचा मृतांमध्ये समावेश आहे. अवघ्या एक आठवड्यातील ३३ मृत्यूने प्रशासनही हवालदिल आहे. यातील काही रुग्ण कोमॉर्बिड असले तरी ही स्थिती चिंताजनक असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत आहेत. शहरात आतापर्यंत २८३, तर तालुक्यात ६ मेअखेर १२१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोना संशयित मृतांची संख्याही चिंताजनक आहे. पूर्व भागात कोरोना चाचणी न केलेल्या काहींचा मृत्यू होत आहे. पूर्व भागात कोरोनाबाधित व मृत्यूचे प्रमाणही कमी आहे. शहरात आजवर नऊ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने ऑक्सिजनच्या बाबतीतही काहीसा दिलासा मिळाला आहे.

शहरातील मेमधील मृत्यूचा तपशील

१ मे - ६

२ मे - १

३ मे- ०

४ मे - ४

५ मे - ६

६ मे - ६

७ मे - ४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT