manja 
नाशिक

नायलॉन मांजा ठरतोय पक्षांसाठी कर्दनकाळ! उपवनसंरक्षकांचे बहिष्कार टाकण्याचे आवाहन 

विनोद बेदरकर

नाशिक : नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच येणाऱ्या संक्रातीच्या सणात आणि त्याच्याही बरेच आधीपासून बाजारात पतंग आणि त्यासाठी लागणार मांजा विक्रीसाठी येतो. बऱ्याचदा हा मांजा नायलॉनचा असल्याने तो असंख्य पक्षांसाठी धोकादायक ठरतो. या हानिकारक नायलॉन मांजाचा वापर करू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

दोन वर्षात ६६ पक्षांचे मृत्यू तीनशेवर जखमी

पतंग उडविण्याच्या नायलॉन मांजामुळे दोन वर्षात 66 पक्षांचा मृत्यू तर तीनशेहून अधिक पक्षी जखमी झालेले आहेत. नागरिकांनी जागरूक होऊन मकर संक्रांतीच्या पंतगबाजीचा आनंद मुक्या पक्षी जीवांच्या मृत्यूचे कारण ठरणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग यांनी केले आहे.

हानिकारक नायलॉन वापर करू नये 

नायलॉन मांजा पक्षी तसेच माणसासाठी देखील घातक आहे. नागरिकांनी जबाबदारी स्वीकारून नायलॉन मांजा न वापरण्याबाबत जनजागृती करावी.‘नायलॉन मांजा हद्दपार करूया, निसर्गाचा अस्सल दागिना सुरक्षित ठेवूया’ अशी शपथ प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेऊन नायलॉन मांजावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन गर्ग यांनी केले आहे. 

प्रशासन उदासीन 

मकरसंक्रांतीपूर्वीच युवक आणि मुलांमध्ये पतंग उडविणे सुरु होते. दरम्यान बाजारातही पतंगांसह विविध प्रकारचा मांजा विक्रीस आला आहे. नायलॉन मांजा विक्रीस प्रतिबंध असला तरी त्याची जोरदार विक्री होताना दिसून येते.  त्यासोबतट नागरिक आणि पक्षी जखमी होण्याचे प्रकारही समोर येत आहेत. प्रशासन मात्र नायलॉन मांजाविक्रीस आळा घालण्यास उदासीन दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT