October heat effects on animal health esakal
नाशिक

पाळीव प्राण्यांची काळजी घ्या! ऑक्टोबर हीटमुळे पशुपक्षी बेजार

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : पावसाळा संपल्यामुळे काही दिवसांपासून उन्हाच्या असह्य झळा सहन कराव्या लागत आहेत. ऑक्टोबर हीटच्या तडाख्यामुळे शहरासह संपूर्ण मोसम खोऱ्यात तापमानाचा पारा चांगलाच वाढल्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. त्यामुळे नागरिकांसह पाळीव प्राणीही कमालीचे बेजार झाले आहेत. गॉगल, टोपी, स्कार्फ, रुमाल घेऊनच प्रत्येक जण घराबाहेर पडताना दिसत आहेत. या वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही होत आहे.

उन्हामुळे माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही त्रास

उन्हाचा जाणवणारा चटका, घामाघूम अवस्था यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातून सुटका व्हावी म्हणून प्रत्येक जण थंड पाणी, सरबत, कोल्ड्रिंक्स, लस्सी, लिंबूसरबत यांचा आधार घेत आहे. मात्र, वाढत्या उष्म्याने त्रस्त पशुपक्ष्यांचे काय, असा प्रश्‍न साहजिकच मनात येतो. वाढत्या उष्म्याचा त्रास माणसांप्रमाणे पशुपक्ष्यांवरही होतो. त्वचारोग, हीटस्ट्रोकने त्यांची अवस्था बिकट होते. काही दिवसांपासून कमाल तापमानाचा वाढता पारा पाहता नागरिकांची अंगाची लाहीलाही होत आहे. उन्हामुळे माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांनाही त्रास होत आहे. उन्हाळ्यात माणसाला भूक कमी लागते, अपचन होते. कधीकधी नाकातून रक्तस्राव होतो. तर काहींना हीटस्ट्रोकही येतो. त्यामुळे वाढत्या उन्हापासून पशुपक्ष्यांची काळजी घेण्याचा सल्ला पशुवैद्यकीय अभ्यासक डॉ. नवल खैरनार यांनी दिला आहे.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा काळजी घेण्याचा सल्ला

माणूस व प्राण्यांमध्येही काही लक्षणे सारखी दिसून येतात. तळपत्या सूर्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी सावलीत बसतात. मात्र, सावलीत बसण्यासारखे उपाय फार काळ पशुपक्ष्यांना उष्म्यापासून वाचवू शकत नाहीत. ज्या प्राण्यांना उष्म्याचा फटका बसतो, अशा प्राण्यांना तातडीने उपचार न मिळाल्यास त्यांचा जीव जाऊ शकतो. मांजर, कुत्रा अशा प्राण्यांच्या तुलनेत पक्ष्यांना उष्म्याचा मोठा फटका बसतो. पक्षी सतत आकाशात उडत असल्याने उष्ण वाऱ्यांचा त्यांना त्रास होतो. यामुळे त्यांना दम लागतो. तसेच, हीटस्ट्रोक होतो.

''उन्हाच्या कडाक्यापासून वाचण्यासाठी पशुपक्षी यांना झाडांच्या सावलीचा आधार शोधावा लागत आहे. ज्यांच्या घरी पाळीव प्राणी आहेत अशांनी कडाक्याच्या उन्हाच्या वातावरणादरम्यान प्राण्यांना, पक्ष्यांना योग्य, समतोल असा आहार द्यावा. घराच्या बाहेर एखाद्या भांड्यात पाणी ठेवावे. यामुळे पशुपक्षांची तहान भागू शकते.'' - डॉ. प्रकाश चव्हाण, पक्षीप्रेमी, नामपूर

पशुपक्ष्यांची अशी घ्या काळजी...

- प्राण्यांना पहाटे, सायंकाळी फेरफटक्यासाठी न्यावे

- चिकन, मटण, मासे देऊ नये

- खायला मोजकाच आणि पोषक आहार द्यावा

- प्राण्यांचे जेवण नेहमी ताजे असावे

- खिडकी, बाल्कनीत छोटेखानी भांड्यात पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे

- पाळीव प्राण्यांना थेट उन्हात बांधू नये

- आजारी प्राण्यांवर पशुवैद्यकांकडून उपचार करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sandeep Kshirsagar: आजीच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला आमदार क्षीरसागर जाणार नाहीत; 'त्या' व्यक्तीचं नाव पत्रिकेत येताच बीडचं राजकारण तापलं

Baramati News : टंचाईच्या पार्श्वभूमीवर बळीराजाला सर्वतोपरी मदत करा; शरद पवार यांचे सरकारला आवाहन....

IND vs WI: रोहित शर्माचं शतक जेवेल अँड्र्यूच्या कॅचने फक्त ८ धावांनी हुकलं, पण ऋतुराजसोबत रचली विक्रमी भागीदारी

Latest Marathi News Live Update : सर्पदंश प्रतिबंधासाठी राज्यात कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन

Ayurveda Tips for Glowing Skin: महागड्या क्रीम्स नकोत! ग्लोइंग स्किनसाठी आयुर्वेदाच्या 'या' १० सवयी अंगीकारा

SCROLL FOR NEXT