Deputy Commissioner of Labor 
नाशिक

कामगार उपायुक्तांसह अधिकाऱ्यांना कोंडले कार्यालयात... प्रहार संघटनेच्या पदाधिकारी विरोधात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सातपूर : ड्रिलबीट्‌स कंपनी विरोधात प्रहार संघटनेच्या कामगारांनी सोमवारी (ता. 6) कामगार उपायुक्त कार्यालयाला कुलूप लावून उपायुक्तांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बंदिस्त करून आंदोलन केले, पण वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला. व्यवस्थापनाशी लवकरच चर्चा करण्याच्या आश्‍वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. प्रहार संघटनाचे पदाधिकारींनी आंदोलन करतांना कामगार उपआयुक सह आधिकारी कर्मचारी कार्यालयात कोंडल्या प्रकरणी प्रहार संघटनेच्या पदाधिकारी विरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

"प्रहार'ने लावले कार्यालयाला कुलूप; पोलिसांच्या मद्यःस्थीने आंदोलन मागे
सातपूर येथील ड्रिलबीट्‌स कंपनीने 81 कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याबाबत कामगार उपायुक्त कार्यालयात अनेक बैठका घेऊनही व्यवस्थापन कर्मचाऱ्यांसमवेत बैठकीला उपस्थित राहत नव्हते. या प्रकाराने संतप्त झालेल्या प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह 81 कामगारांनी कामगार उपायुक्त कार्यालयाचा दरवाजा बंद करून आंदोलन केले.

यासाठी कोंडले कामगार उपायुक्तांसह अधिकाऱ्यांना 

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त वि. ना. माळी, पोलिस उपायुक्त अशोक नखाते, सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे यांनी "प्रहार'चे अध्यक्ष अनिल भडांगे यांच्याशी चर्चा केली. चर्चेत पोलिस प्रशासन व कामगार उपायुक्तांनी 8 जुलैला व्यवस्थापनासमवेत सकारात्मक चर्चा करू, असा शब्द दिला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सुमारे 80 कामगार उपस्थित

या वेळी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनात प्रहारचे जिल्हाप्रमुख अनिल भडांगे, जिल्हा सरचिटणीस नितीन गवळी, उपजिल्हाप्रमुख अमजद पठाण, कार्याध्यक्ष मोतीलाल चव्हाण, सहसरचिटणीस वैभव देशमुख, शहरप्रमुख श्‍याम गोसावी आदी कार्यकर्ते, पदाधिकारी व कंपनीतील सुमारे 80 कामगार उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदी मंत्रिमंडळात मोठा बदल! केंद्रीय राज्यमंत्र्याने दिला पदाचा राजीनामा, राष्ट्रपतींकडून तत्काळ मंजुरी, कारण काय?

Yuktadhara Mapping No Fees: युक्तधारा मॅपिंगसाठी कोणतेही शुल्क नाही; पैशांची मागणी झाल्यास तक्रार करा – उपसरपंच अक्षय मगर

Yavatmal Police Operation Prasthan: विद्यार्थी सुरक्षेसाठी यवतमाळ पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रस्थान’; १,२०० मुख्याध्यापकांना मार्गदर्शन, शाळांत सीसीटीव्ही, तक्रार पेटी व नशामुक्त परिसराची सक्ती

Railway Fraud: पुणे-मुझफ्फरपूर एक्स्प्रेसमध्ये बनावट तिकीट पर्यवेक्षक बनून प्रवाशांची लूट; दोन कोच अटेंडंट रंगेहात पकडले

Pakistan Attack: स्फोटकांनी भरलेली गाडी धडकली अन्...; पाकिस्तानात भीषण आत्मघाती हल्ला! १२ सैनिकांसह १५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT