Drinking esakal
नाशिक

नाशिक : बालभारती कार्यालयात अधिकाऱ्याचे ऑन ड्यूटी मद्यपान

राजेंद्र बच्छाव

सिडको (नाशिक) : सिडको लेखानगर येथील बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार वितरण केंद्रावर शासनाने नेमलेले भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे ऑन ड्यूटी दारूच्या नशेत आढळल्याने खळबळ माजली आहे.

वितरण केंद्रावरील या प्रकाराने खळबळ

डामसे ऑन ड्यूटी दारू पिऊन महिला व इतर कर्मचारी, तसेच माथाडी कामगारांना त्रास देत असल्याची तक्रार पुस्तकी अधीक्षक शुभांगी नांदखिले यांनी श्रमिक माथाडी व गार्डबोर्ड संघटनेच्या कार्यालयात केली असता, संघटनेचे पदाधिकारी सागर देशमुख आणि शिवसेना विभागप्रमुख नीलेश साळुंके हे भांडार व्यवस्थापकांना भेटण्यासाठी गेले. या वेळी ते बालभारती कार्यालयाच्या वरती असलेल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी मद्यप्राशन करीत असल्याचे आढळले. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी अंबड पोलिस ठाण्याला फोन करून ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविले आहे. घडलेल्या घटनेची माहिती संचालक कृष्णकांत पाटील यांनाही फोनद्वारे देण्यात आली असून, डामसे यांच्यावर कारवाईचे आश्वासन दिल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Sandeep Karnik : नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, नेमकं प्रकरण काय? २०१९ मध्ये काय घडलं होतं?

ICUत उंदराने कुरतडला हात, १२ तासांत महिला रुग्णाचा मृत्यू; रुग्णालयाने डॉक्टरसह नर्सवर केली कारवाई

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरातील बिंदू चौकात गॅस गळतीमुळे आग

LPG Import India : गॅस संकट कमी होणार ! कतारहून भारतात आणला ४६,००० मॅट्रिक टन LPG; तब्बल 'इतके' लाख सिलिंडर्स भरणार

Chhatrapati Sambhajinagar News: लातूर-नांदेडला अवकाळी पावसानं झोडपलं, वीज कोसळून १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; वादळी वाऱ्यानं मोठं नुकसान

SCROLL FOR NEXT