sanjay gosavi.jpg 
नाशिक

दारामध्ये हातात संजीवनी घेऊन जणू ‘देव’च उभा होता..अन् काकांचे हात आपसूकच जोडले गेले. 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मधुमेह म्हणजे आयुष्यालाच जडलेली व्याधी. औषधांची, डॉक्टरांची गरज कधी भासेल सांगता येत नाही. या रुग्णांसाठी औषधे ही ‘संजीवनी’ पेक्षा कमी नसतात. दिपाली नगर (मुंबई नाका) येथील राहणाऱ्या एका जेष्ठ नागरिकाची मधुमेहाची औषधे सकाळी संपली. घरात ते आणि त्यांची मुलगी दोघेच. बाहेर संचारबंदी असल्याने कसं बाहेर जायचं, असा प्रश्न त्यांना पडला. मात्र त्यांच्या मदतीला नाशिकचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि नाशिकचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार धावून आले. संबंधित रुग्णाने फोन केल्यानंतर त्यांना अवघ्या तासाभरात मधुमेहाची औषधी घरपोच मिळाली. दारात औषधे घेवून आलेले ‘देवदूत’ पाहताच संबंधित रुग्णाचे हात आपसूकच जोडले गेले. 

नेमकं काय घडलं?
आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांची तत्परता मुंबई नाका येथील दिपाली नगरात संजय गोसावी, वय 49 वर्षे हे आपल्या मुलीसोबत राहतात. गोसावी हे मधुमेहाचे रुग्ण आहेत. त्यांना दररोज काही औषधी घ्यावी लागतात. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये गोसावी अडकले. आपल्याला आधीच व्याधी असल्यामुळे कशाला बाहेर पडायचे त्यामुळे त्यांनी स्वत:ला घरात क्वारंटाइन केलेले होते. मात्र आज गुरुवार (ता.16) एपिल रोजी त्यांची मधुमेहाची औषधी संपली. घरात औषधे नाहीत आणि बाहेर कोरोनाचे संकट अशा संकटात गोसावी अडकलेले असताना त्यांना एक आशेचा किरण दिसला. नाशिक जिल्हा आपत्ती निवारण कक्ष गोसावी यांनी लागलीच आपत्ती निवारण कक्षाला फोन करून आपली अडचण सांगितली. तेथील अधिकाऱ्यांनी लगेच डॉ. अनंत पवार यांचा फोन नंबर त्यांना दिला. गोसावी यांनी डॉ. पवार यांनी आपली अडचण आणि औषधांबाबत माहिती दिली. 

शासकीय वाहन थांबताच त्यांचा जीव भांड्यात पडला
डॉ. पवार गेल्या महिनाभरापासून कोरोना रुग्ण तपासाणी आणि इतर संबंधित कामांमध्ये पूर्ण व्यस्त आहेत. मात्र त्यांना गोसावी यांच्या व्याधीबाबत समजताच त्यांनी लगेचच तपासणी पेपर तयार करून आपल्या यंत्रणेद्वारे अवघ्या तासाभरात गोसावी यांना घरपोच औषधे पुरविली. फोन केल्यापासून बेचेन असलेल्या गोसावी यांच्या दारात शासकीय वाहन थांबताच त्यांचा जीव भांड्यात पडला. संचारबंदी, लॉकडाऊन, कोरोनाचे वाढते रुग्ण आणि एकूणच आरोग्य व्यवस्थेवर वाढता ताण या सगळ्या अडचणींतूनही मार्ग काढत डॉ. अनंत पवार यांनी मधुमेही रुग्णाला अवघ्या तासाभरात औषधी उपलब्ध करून दिल्याने नाशिकच्या आरोग्य व्यवस्थेविषयी आणि स्टाफविषयी ‘सर्वसामान्य नाशिककर' असलेल्या गोसावी यांनी आभार व्यक्त केले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Result 2025 Live Updates : तेज प्रतापही पराभवाच्या जवळ, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Dharmendra : धर्मेंद्र यांचा हॉस्पिटलमधील व्हिडीओ लीक करणाऱ्या कर्मचाऱ्याला झाली अटक

Amravati News: प्रसूत महिलेला नेण्यासाठी कर्मचाऱ्यांनी केली खाटेची कावड; शेतातून चार किलोमीटर पायपीट करीत वाचविला जीव

Dr. Narendra Jadhav :"पहिली ते बारावीपर्यंत मराठीसह इंग्रजी अनिवार्य करा!" पुणेकरांची डॉ. नरेंद्र जाधव समितीकडे एकमुखी मागणी

Sahyadri Tiger Reserve: विदर्भातील वाघ सह्याद्रीत नेण्यास परवानगी; एक वाघीण स्थलांतरित, आठ वाघांना टप्प्याटप्प्याने नेणार

SCROLL FOR NEXT