senior-citizen 1234.jpg 
नाशिक

झिंगाट मद्यपीकडून वृध्दास दगड फेकून मारहाण.. मंदिर परिसरातील प्रकार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिध्दी विनायक मंदिर परिसरात असतांना मद्याच्या नशेत असलेल्या कडाळे याने त्यांना गाठले. यावेळी संशयीताने आम्हाला मंदिराच्या नळावर पाणी का भरू देत नाही. तुमच्या बापाचा नळ आहे का ? असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर जे काही घडले ते धक्कादायक होते

काय घडले नेमके?

सुरज कडाळे (१९ रा.सिध्दीविनायक मंदिराच्या बाजूला) असे संशयीताचे नाव असून याप्रकरणी मारूती भिकाजी आभाळे (६१ रा.जनार्दन स्वामी निवास,अशोकनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. आभाळे बुधवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास सिध्दी विनायक मंदिर परिसरात असतांना मद्याच्या नशेत असलेल्या कडाळे याने त्यांना गाठले. यावेळी संशयीताने आम्हाला मंदिराच्या नळावर पाणी का भरू देत नाही. तुमच्या बापाचा नळ आहे का ? असे म्हणून शिवीगाळ केली. यावेळी आभाळे त्यास समजून सागण्यासाठी गेले असता संशयीताने त्यांना जिवे मारण्याची धमकी देत दगड फेकून मारला. या घटनेत आभाळे जखमी झाले असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

मारहाण व दुखापतीचा गुन्हा दाखल

सार्वजनिक नळावर पाणी भरण्याच्या कारणातून वृध्दास शिवीगाळ करीत मद्यपीने दगड फेकून मारल्याची घटना अशोकनगर भागात घडली. सातपूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी मारहाण व दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Longest Flyover : गडकरींचा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण! इंदोरा ते दिघोरी 8.9 किमीचा प्रवास आता सुसाट; उड्डाणपुलाला मिळणार डॉ. हेडगेवार यांचे नाव, जाणून घ्या नवीन पुलाविषयी...

६ महिन्यांच्या चिमुकल्यावर कुत्र्याचा हल्ला, पिटबुल नव्हे तर American Bully; मालक म्हणाला, उपचारावर ४ लाख खर्च केले

Ajit Agarkar Salary : अजित आगरकरने BCCI कडून किती पगार घेतला? त्याच्या कार्यकाळात भारताची कामगिरी कशी झाली? Report Card

Lek Ladki Scheme : ‘लाडक्या लेकीं ’च्या पैशांवरही डल्ला! बीडमधील प्रकार, अधिकारी म्हणतात ३५९ मुलींच्या नावे दुबार निधी गेला

Latest Marathi News Update : सोने दरात आणखी वाढ, सोने दिड लाखांवर

SCROLL FOR NEXT