Dussehra  SOMNATH KOKARE
नाशिक

नाशिक : दसऱ्यानिमित्त उजळली सोन्याची बाजारपेठ

कुणाल संत

नाशिक : विजयादशमी पूर्वसंध्येला नागरिकांनी सोने, चांदी दागिने खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली. नागरिकांनी दागिने खरेदीला चांगला प्रतिसाद दिल्याने सोन्याची बाजारपेठ उजाळून निघाली. राज्यात कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षापासून सोने- चांदीच्या बाजारपेठेत अपेक्षेप्रमाणे नागरिकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, चालू हंगामात कोरोनाचे कमी झालेले प्रमाण, सोन्याच्या दरात झालेली कमालीची घसरण यामुळे विजयादशमी पूर्वसंध्येला नाशिककरांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधत सोने, चांदीच्या दुकानांमध्ये चांगलीच गर्दी केली.

दसऱ्यानिमित्त प्रथमच नागरिकांकडून चांगला मिळत प्रतिसाद मिळाल्याने सराफांकडून जय्यत तयारी करण्यात आली होती. विजयादशमी मुहूर्तावर मंगळसूत्र, हार, बिस्कीट, अंगठी, बांगड्या, कानातले दागिने यांना खास करून मागणी होत होती. तसेच, चांदीचे नवनवीन अलंकार, पूजेची भांडी, हिऱ्यांचे दागिनेदेखील महिलांचे लक्ष वेधून घेत होते.

१० ते ५० टक्के सूट

कोरोनानंतर प्रथमच विजयादशमीनिमित्त सोने, चांदी खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी चांगली गर्दी केली होती. दसऱ्यानिमित्त ग्राहकांनादेखील आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सराफांकडून दागिन्यांच्या घडणावळीवर सुमारे दहा ते ५० टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच, चांदीच्या दागिन्यांवरदेखील आकर्षक भेट वस्तू दिल्या जात आहे.

नवरात्रीच्या सुरवातीपासून सोने, चांदी खरेदीसाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर सर्व नियमांचे पालन केले जात आहे.
- स्वाती जाधव, व्यवस्थापक, पू. ना. गाडगीळ ॲन्ड सन्स, नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT