challenge 1.jpg 
नाशिक

स्टाईलमध्ये लावली 'अशी' पैज...की होऊन बसला आयुष्याशी खेळ!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : साहिल खरे याच्यासह कालिदास वाघमारे व अमोल उर्फ बाळु कंकाळ (दोघे रा. संत कबीरनगर) हे तिघे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या गच्चीवर बसलेले होते. त्यावेळी नेम धरुन गजाने विजेच्या तारेला कोण मारतो, अशी तिघांमध्ये पैंज लागली. यात दोघा संशयितांपैकी एकाने गज विजेच्या तारेवर मारला. त्यानंतर जे काही झाले ते धक्कादायक होते.

असा घडला प्रकार... 

गंगापूर रोड परिसरातील संत कबीरनगर येथील समाज मंदिराजवळील मंगल कंकाळ यांच्या घराच्या गच्चीवर मंगळवारी (ता.7) हा प्रकार घडला. साहिल खरे याच्यासह कालिदास वाघमारे व अमोल उर्फ बाळु कंकाळ (दोघे रा. संत कबीरनगर) हे तिघे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या गच्चीवर बसलेले होते. त्यावेळी नेम धरुन गजाने विजेच्या तारेला कोण मारतो, अशी तिघांमध्ये पैंज लागली. यात दोघा संशयितांपैकी एकाने गज विजेच्या तारेवर मारला. तारेला गज लागल्याने स्पार्किंग झाली. त्यातून उडालेल्या ज्वलनशिल थिणग्या साहिलच्या अंगावर पडल्या. यात साहिल 75 टक्के गंभीररित्या भाजला होता. त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा रविवारी (ता.12) मृत्यु झाला.

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

विजेच्या तारेला गजाने मारण्याची पैज 17 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतली.  याप्रकरणी गंगापूर पोलिसात संशयित कालिदास व अमोल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत गंभीररीत्या भाजल्याने साहिल अशोक खरे (17) याचा उपचारादरम्यान रविवारी (ता.12) जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. विजेच्या तारेला गज मारल्याने उडालेल्या थिणग्यातून गंभीररित्या भाजलेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी दोघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाम बोट दुर्घटनेत 15 भारतीयांचा मृत्यू; बोटीत असलेल्या 32 भारतीयांची नावं आली समोर

Pune News: कर्तव्य बजावणाऱ्या PSI ला दिलासा; पुण्यातील डेक्कन हॉटेल कारवाईप्रकरणी संदीप कदम यांचे निलंबन मागे

Karad Crime: कऱ्हाड शहर पोलिसांची दमदार कामगिरी! पिस्टल विक्रीस आलेल्या चौघांना अटक; चार देशी बनावटीचे पिस्टल, आठ जिवंत काडतुसे जप्त

MPSC Protest: विद्यार्थ्यांसोबत आजीही मैदानात! एमपीएससी आणि पोलिस भरतीसाठी संगमनेरमध्ये अनोखे आंदोलन, प्रांत कार्यालयासमोर ठिय्या

Ration Distribution: रेशनधारकांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्ट ते ऑक्टोबरचे तीन महिन्यांचे धान्य एकाचवेळी मिळणार; वितरणात मोठा बदल

SCROLL FOR NEXT