crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : एटीएममधून परस्पर सव्वा लाख लंपास

सकाळ वृत्तसेवा

जुने नाशिक : भोई गल्ली येथील एटीएममध्ये अडकलेल्या कार्डची संधी साधत संशयितांनी सुमारे एक लाख वीस हजाराची रक्कम परस्पर काढल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. जीत टाक भोई गल्लीत असलेल्या एटीएममध्ये मंगळवारी (ता. २१) पैसे काढण्यासाठी गेले होते. (one half lakh loot from ATM Nashik crime news)

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

एटीएममधून पैसे तर आले नाही. एटीएम कार्ड मात्र मशिनमध्ये अडकून पडले. एटीएममध्ये असलेल्या संशयितांसह त्याच्या मित्राने श्री. टाक यांना एटीएमच्या भिंतीवर असलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले.

त्यांनी संपर्क केला असता, त्यांच्याकडून तीन वाजता इंजिनिअर येऊन मशिनमध्ये अडकलेले कार्ड काढून देण्याचे सांगण्यात आले. दरम्यान संशयितांनी कार्ड काढून देण्याचा बनाव करत वेळोवेळी बँक खात्यातून एक लाख वीस हजाराची रक्कम लंपास केली.

रक्कम काढल्याचा संदेश मोबाईलवर आल्याने त्यांनी बँकेत जाऊन घडलेली घटना सांगितली. त्वरित त्यांचे कार्ड बंद करण्यात आले. शुक्रवारी (ता. २४) पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT