nylon cord.png 
नाशिक

मांज्याच्या रुपात रस्त्यात आडवा आला काळ; काही सेकंदातच घडला प्रकार

अरुण खांगळ

लासलगाव (नाशिक) : सकाळी अकरा वाजेच्या सुमारास रफिक नवाजखान पठाण दुचाकीने जात होते. अचानक नायलॉन मांजा त्यांच्या नाकात अडकल्यामुळे धारदार मांजाने त्यांचे क्षणार्धात नाक कापले गेले. अन् नंतर...वाचा काय घडले? 

अशी घडली घटना

निमगाव वाकडा रोडवर असलेल्या राजवाडा परिसरात ही घटना घडली.  लासलगाव येथील पिंजार गल्ली येथील रफिक नवाजखान पठाण हे रविवारी सकाळी अकराच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवरून राजवाडा परिसरातून जात असताना अचानक नायलॉन मांजा रफिक पठाण यांच्या नाकात अडकल्यामुळे धारदार मांजाने त्यांचे क्षणार्धात नाक कापले गेले. नायलॉन मांजाने नाकाच्या स्नायू व रक्तवाहिनी तुटल्याने संबंधितावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागली. या वेळी जवळच उभ्या असलेल्या त्यांच्या पुतण्याने तातडीने त्यांना येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या नाकावर शस्त्रक्रिया केली. यात त्याच्या नाकावर २५ टाके टाकले. 

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाईची गरज 

नायलॉन मांजा विक्रीवर बंदी आहे. त्यानंतरही शहर व परिसरात नायलॉन मांजाची सर्रास विक्री होते. पठाण यांच्यावर बेतलेला प्रसंग गांभीर्याने घेऊन स्थानिक प्रशासनाने नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक निर्बंध आणून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT