one village one ganesh festival concept response in nashik marathi news 
नाशिक

कोरोनाने बदलला गणेशोत्सवाचा ट्रेंड; जिल्हयात 'इतक्या' ठिकाणी 'एक गाव, एक गणपती'

एस.डी.आहीरे

नाशिक/पिंपळगावं बसवंत : कोरोनामुळे गणेशोत्सवाचा ट्रेंड बदलल्याचे दिसुन आले आहे.कोरोनामुळे उत्सवाला मर्यादा आल्या.त्यात जिल्हा पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत एक गाव,एक गणपती चा पॅटर्न नाशिक जिल्ह्यात सुरू झाल्याचे चित्र आहे.मागील वर्षी अवघे 110 गावात एक गाव,एक गणपती होते.यंदा मात्र त्याच दुप्पटीने वाढ झाली आहे.

 मंडळांचे पोलीसांना सहकार्य

नाशिक जिल्ह्यात तब्बल 442 गावामध्ये गणरायाचा उत्सवात नागरिकांनी एकोपा दाखविला आहे. हा पॅटर्न रूजविण्यात मंडळाच्या सहकार्याने पोलीसांना यश आले.तर जिल्हायत 200 हुन अधिक गावात सार्वजनिक गणेशमुर्ती न बसवण्याचा निर्धार केला आहे.संकटकाळात मंडळांनी दाखवलेले हे औदार्य गर्दीला फाटा देऊन कोरोनाला दुर ठेवण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे.

पोलीस दलाच्या या आवाहनाला प्रतिसाद

नाशिक जिल्ह्यात दर वर्षी गणेश मंडलाकडुन मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो.सार्वजनिक मंडळे नावीन्यपुर्ण देखावे,सजावटी करून सामाजीक उपक्रमही राबवितात.रक्तदान,आरोग्य तपासणी शिबीर असे उपक्रम राबवितात.यंदा मात्र कोरोना महामारीचे संकट आले आहे.त्यामुळे अनेकांवर आर्थिक कुर्डाडच आली आहे.
अनेकांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.समाजाची आर्थिकघडी विस्कटल्याचे पाहुन पोलीस अधिक्षक डाॅ.आरती सिंग,अप्पर पोलीस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांनी एक गाव,एक गणपती ही संकल्पना जिल्हयात रूजविण्याच प्रयत्न केला.स्थानिक पोलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचार्यानी बैठका घेऊन जनजागृती केली.त्याचा विचार सामाजिक बांधीलकीतुन जिल्ह्यातील बहुतांश गावातील गणेश मंडळांनी केला आणि पोलीस दलाच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला.त्यानुसार गणेश मंडळांनी समाजभान राखुन जिल्ह्यात एक गाव,एक गणपती असा नाशिक जिल्ह्यात पॅटर्न यशस्वी झाला आहे.

442  ग्रांमपंचायतींनी राबवला उपक्रम

यंदा नाशिक जिलह्यात एक हजार 373 ग्रामपंचायतीपैकी तब्बल 442 हा उपक्रम राबविल्याचे पोलीस दलाकडे नोंद झाली आहे.त्यात बरोबर पोलीसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातल तब्बल 200 हुन अधिक गावांत गणेश मंडळांनी सार्वाजनिक गणेशमुर्ती न बसवण्याचा निर्णय घेला आहे. 

उत्सव खर्च सामाजिक उपक्रमास...

गणेशोत्सव काळात दर वर्षी मोठ्या प्रमाणात गणेश मंडळांकडुन खर्च होतो.यंदा कोरोनामुळे त्या खर्चाला फाटा मिळालेला आहे.त्याचा विचार करून अनेकक गणेश मंडळांनी तो खर्च सामाजिक उपक्रमासाठी वापण्याचा निर्धार केलेला आहे.त्याअंतर्गत काही गणेश मंडळांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्‍वासन पोलीस दलाला दिले आहे.त्याचबरोबर मंडळाकडुन वृक्षारोपणासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

पोलीस दलाने जिल्ह्यातील गणेश मंडलांना केलेल्या आवाहनाला मंडळांनी चांगाल प्रतिसाद दिला.कोरोनामुळे अऩेक गावांतील मंडळांनी गणेशमुर्तीच न बसवण्याचा निर्णय घेताल आहे.कोरोनाच्या पाश्‍वभुमीवर मंडळांनी महत्त्वाचा स्तुत्य निर्णय घेतला आहे.  - शर्मिष्ठा वालावलणकर(अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक,नाशिक).

आम्ही दरवर्षी धार्मिक देखावे उभारून गणेशोत्सव भव्यदिव्य स्वरूपात साजरा करतो.कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी उत्सव साधेपणाने साजरा करणे आवश्‍यक होते.एक गाव एक गणपतीत सहभाग घेऊन उत्सव साधेपणाने करण्याने वाचलेल्या निधीतुन गरजुंना मदत करणार आहे.कोरोना योध्द्याचा प्रोत्साहनपर सत्कार करणार आहे. -गणेश बनकर (अध्यक्ष,नॅशनल हायवे मित्र मंडळ,पिंपळगावं बसवंत)  

 
संपादन- रोहित कणसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

SCROLL FOR NEXT