lasalgaon onion 456.jpg 
नाशिक

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आजही कांदा लिलाव बंदच

अरुण खंगाळ

लासलगाव (जि.नाशिक) : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२७) मुख्य कार्यालयात निफाडचे सहाय्यक निबंधक अभिजीत देशपांडे यांच्या उपस्थितीत व्यापारी वर्गाची बैठक संपन्न झाली.या बैठकीत कोणताही सन्मानजनक तोडगा निघाला नाही, व्यापाऱ्याने त्यांच्याकडून लवकर डिस्पॅच करून कांदा लिलाव सुरू करण्याचे आवाहन केले.

आवक नसल्यामुळे आजही कांद्याचे लिलाव बंद
तथापि आवक नसल्यामुळे आजही कांद्याचे लिलाव होऊ शकले नाही.
या बैठकीला बाजार समितीच्या  सभापती सुवर्णा जगताप बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्यासह व्यापारी वर्ग उपस्थित होते. दरम्यान लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (ता.२६) सोमवारी कांद्याची आवक न आल्याने लिलाव सुरु झाले नाही. गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. जोरदार पावसानं शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने कांदा साठवणुकीवर निर्बंध आणल्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. 

लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची मोठी गैरसोय

गेल्या दोन दिवसांपासून साठवणुकीवर निर्बंध घातले या संदर्भात सोशल मिडीयावर मेसेज व्हायरल होत होते. त्यामुळे शेतकरी वर्गाने माल विक्रीस आणला नाही, जिल्ह्यातील प्रमुख बाजारसमिती मध्ये आवके अभावी लिलाव बंद पडले. बाजार समिती च्या सभापती सुुुवर्णा जगताप यांनी पुरेशी आवक आल्यावर लिलाव सुरु करण्यात येतील असे सांगितले.विंचुर बाजार समिती मध्ये 5 नग लिलावासाठी आले होते. ते पण शेतकरी वर्गाने घरी घेऊन जाणे पसंद केले.

संपादन - ज्योती देवरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT