Red Onion News esakal
नाशिक

Nashik Onion News: मुंगसे बाजारात 4 दिवसात कांद्याची 25 कोटींची उलाढाल! 85 हजार क्विटंलची विक्री

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : येथील बाजार समितीच्या मुंगसे उपबाजारात दिवाळी सुटीनंतर कांद्याची मोठी आवक आहे. चार दिवसात ८५ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. त्यातून २५ कोटींहून अधिक उलाढाल झाली.

लाल कांद्याचा भाव क्विटंलला चार हजाराच्या पुढे गेला असला, तरी उन्हाळी कांद्याचा भाव ४०० ते ५०० रुपयांनी घसरला. शुक्रवारी (ता. २४) लाल कांद्याला कमाल चार हजार २५० रुपये भाव मिळाला. उन्हाळी कांदा सर्वाधिक ३ हजार ३५६ रुपये भावाने विकला. (Onion turnover of 25 crores in 4 days in Mungse market Sales of 85 thousand quintals nashik)

मुंगसे कांदा उपबाजार १३ दिवसांच्या दिवाळी सुटीनंतर मंगळवारी (ता. २१) सुरू झाला.

पहिल्या दिवशी ९९१ वाहनातून १८ हजार क्विटंलहून अधिक, बुधवारी (ता. २२) एक हजार ५५ वाहनातून २० हजार क्विटंलहून अधिक, गुरुवारी (ता. २३) १ हजार ११२ वाहनातून २१ हजार क्विटंलहून अधिक, तर शुक्रवारी (ता. २४) एक हजार ४१३ वाहनातून २२ हजार क्विटंलहून अधिक कांद्याची आवक होती. मुंगसे उपबाजारात सकाळ व सायंकाळ अशा दोन्ही सत्रात लिलाव होत आहेत.

शुक्रवारी (ता. २४) उन्हाळी कांद्याला किमान दोन हजार, तर कमाल ३ हजार ५५६, सरासरी २ हजार ९०० रुपये असा क्विटंलचा भाव होता. बहुतांशी कांदा २ हजार ५०० ते २ हजार ७०० रुपयांना विकला गेला.

उन्हाळी सुपर ३ हजार २५० ते ३ हजार ५५६, मध्यम प्रतीचा २ हजार ७५० ते ३ हजार २०० रुपये क्विंटल भाव होता. लाल कांद्याला किमान २ हजार ८५०, कमाल चार हजार २५० आणि सरासरी ३ हजार ५०० रुपये क्विंटल असा भाव मिळाला.

साडेतीन हजार ते तीन हजार ७०० या दरम्यान बहुतांशी कांदा विकला गेला. लाल सुपरचा ३ हजार ८०० ते ४ हजार २५०, मध्यम प्रतीचा (गोल्टा) ३ हजार ५०० ते ३ हजार ८५०, गोल्टीचा २ हजार ८५० ते ३ हजार २०० रुपये क्विंटल भाव होता.

मुंगसे बाजार शनिवारी (ता. २५) व रविवारी (ता. २६) सुटीमुळे बंद राहणार आहे. सोमवारी (ता. २७) गुरुनानक जयंतीची सुटी आहे. तीन दिवसाच्या सुटीनंतर मंगळवारी (ता. २८) बाजार सुरू होईल. त्यामुळे आगामी आठवड्यात कांद्याची आवक वाढणार आहे.

भाव काही प्रमाणात घसरल्याने शेतकऱ्यांनी चाळींमध्ये राखून ठेवलेला उन्हाळी कांदा मोठ्याप्रमाणात बाजारात आणण्यास सुरुवात केली आहे.

"मुंगसे बाजारात उन्हाळी व लाल अशा दोन्ही कांद्यांना चांगला भाव मिळत आहे. शेतकरी बांधवांना कांद्याचे पैसे व्यापाऱ्यांकडून तातडीने अदा केले जात आहेत. शेतकरी, व्यापारी, हमाल, मापारी आदी घटकांसाठी बाजार समितीने लिलावाच्या ठिकाणी दिवसभर दोन ट्रॉलीद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जाते. त्यासाठी रोज ३५ ते ४० पाण्याचे जार लागतात."

- विनोद चव्हाण (उपसभापती, मालेगाव बाजार समिती)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT