apply.png 
नाशिक

UPSC EXAM : विविध पदांसाठी 'युपीएससी'तर्फे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु...वाचा सविस्तर

सकाळवृत्तसेवा

नाशिक : केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत यापूर्वी जाहिराती प्रसिद्ध केलेल्या असतांना, कोरोनामुळे उद्भवलेल्या परीस्थितीत अर्ज प्रक्रिया मंदावली होती. परंतु आता आयोगामार्फत या विविध पदांच्या 94 जागांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरवात केली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांना या तारखेपर्यंत ऑनलाइन स्वरूपात अर्ज भरण्याची संधी उपलब्ध असणार आहे. 

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेस सुरवात

काही दिवसांपूर्वी केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत दोन जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. यामध्ये केंद्रिय सुरक्षा मंत्रालयासह अन्य विविध केंद्रीय स्तरावरील विभागांमध्ये रिक्‍त असलेल्या पदांचा तपशील जारी करण्यात आला होता. या दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये नियोजित असलेल्या परीक्षा रद्द ठरविल्या होत्या. या पार्श्‍वभुमिवर या परीक्षांकरीता अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील मंदावली होती. जनजीवन सुरळीत होत असतांना आता या जाहिरातीत नमूद केलेल्या पदांकरीता ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया गेल्या शनिवार (ता.11) पासून सुरू झालेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना येत्या 30 जुलैपर्यंत अर्ज भरता येणार आहे. जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे यापूर्वीच्या अटी व शर्ती उमेदवारांना लागू राहतील. 

असे आहेत विविध पद
 
उपलब्ध नव्वदहून अधिक रिक्‍त जागांपैकी सर्वाधिक जागा ह्या सहाय्यक अभियंता (असिस्टंट इंजिनिअर) या पदासाठीच्या आहेत. याशिवाय नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट येथे चीफ डिझाइन इंजिनिअरपदाची एक जागा, आकॅलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया येथील डेप्युटी सुप्रिटंडींग ऍरकॉलॉजीकल केमिस्टच्या दोन जागा, सुरक्षा मंत्रालयात सहाय्यक अभियंता पदाच्या जागा उपलब्ध आहेत. याशिवाय नॅशनल झुऑलॉजिकल पार्क येथेही असिस्टंट व्हॅअर्निटी ऑफिसर, ईएसआयसी येथे सहाय्यक संचालक पदाच्या तेरा जागा आहेत. अन्य विविध केंद्रीय स्तरावरील विभागांतील रिक्‍त जागांचा यात समावेश आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT