server down sakal
नाशिक

Nashik: ऑनलाईन हजेरीने वाढवली शिक्षकांची डोकेदुखी! सर्व्‍हर डाऊनमुळे आदिवासी, डोंगराळ भागातील शिक्षक अडचणीत

विजय पगारे

इगतपुरी : पटसंख्‍येच्‍या मुद्यावर शिक्षण विभागाने शोधलेला ऑनलाईन हजेरीचा उपाय शिक्षकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. आदिवासी, डोंगराळ व दुर्गम भागात कायमच असणारा इंटरनेटचा अभाव, सर्व्‍हर डाऊनच्या समस्‍येमुळे शिक्षक अडचणीत सापडले आहेत.

आता अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल ज्ञानार्जनातील मुख्य अडथळा ठरत आहे. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थी हजेरी भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. (Online attendance increased headache of teachers Due to server down teachers in tribal and hilly areas in trouble Nashik)

शासनाने शिक्षकांना अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल किंवा इंटरनेटच्‍या सुविधेची तरतूद केली नसताना व्हॉट्सअपच्या माध्यमातून रोजच नव्हे, तर क्षणाक्षणाला वेगवेगळ्या प्रकारची माहिती, अहवाल वरिष्ठ मागवत आहेत.

यूडायस प्लस, स्वीफ्ट चॅट, एमडीएम अ‍ॅप, शालार्थ, यु-ट्यूब, व्हॉट्सअ‍ॅपवर पत्रे दररोज धडकत असल्यामुळेही ज्ञानार्जनाच्या मुख्य कार्यात व्यत्यय येत आहे.

दुर्गम व आदिवासी भागातील शाळांमध्ये इंटरनेट आणि संगणकाची व्यवस्था नसताना विविध अ‍ॅप आणि वेबसाईटवर माहिती भरायला सांगितली जाते.

माहिती ऑफलाईन मागविली जात असल्याने मुख्याध्यापकांसह शिक्षकांनी ज्ञानार्जन कसे करावे, असा प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहे. अनेक शाळा द्विशिक्षकी आहेत. शिक्षकांना दोन दोन वर्गांचे अध्यापन करावे लागते. त्याने खरोखरच विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन होत असेल का, असा प्रश्‍न पालक विचारत आहेत.

काही भागातील शिक्षक बीएलओ असल्याने शालेय वेळेत ठेवलेल्या बैठका, घरोघरी जाऊन मतदारनोंदणी आदी कामे करावी लागतात. त्यामुळे शैक्षणिक कामे सोडून अशैक्षणिक कामात शिक्षकांना गुंतवून ठेवले जात असल्याचा आरोप शिक्षकांनी केला आहे.

काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब गरजेचा असला, तरी शासनाने इंटरनेट, संगणक व संगणकचालक आदी सुविधा शाळांना पुरविणे गरजेचे आहे, असे चिंचलेखैरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती तळपाडे यांनी सांगितले.

पायाभूत सुविधांचा अभाव

इंटरनेटशी संबंधित पायाभूत सुविधांचा शाळास्तरावर मोठा अभाव आहे. तरीही अनेक बाबी ऑनलाईन करण्याचा आग्रह शासन स्तरावरून आहे. आता विद्यार्थी व शिक्षक हजेरीसारख्या नियमित बाबी ऑनलाईन कराव्यात, अशी अपेक्षा होत आहे.

मात्र, इंटरनेटशी संबंधित पायाभूत सुविधा शाळास्तरावर उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत असे प्रयोग यशस्वी होणे अशक्य वाटते, असे मत शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष सचिन कापडणीस यांनी व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: साडेतीनशे टक्के शुल्क लावणार होतो; ट्रम्प यांच्याकडून संघर्ष थांबविल्याचा पुनरुच्चार

Viral Video Teacher : शाळेतच मुख्याध्यापकाचा इंग्लिश नजराणा! प्रार्थना सुरू असताना कांबळे सर टल्ली होऊन नाचू लागले अन् व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Latest Marathi News Live Update : मालेगावात आंदोलकांचा कोर्टात शिरण्याचा प्रयत्न

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

SCROLL FOR NEXT