Fake Certificate esakal
नाशिक

Nashik Online fake Certificates: पेठ तालुक्यात ऑनलाईन बनावट दाखले! आपले सरकार केंद्र संचालकांची ‘तहसील’ला माहिती

आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून पेठ तालुक्यात बनावट जातीचे व उत्पन्नाचे दाखले दिले जात असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पेठ : आपले सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून पेठ तालुक्यात बनावट जातीचे व उत्पन्नाचे दाखले दिले जात असल्याची चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे.

तालुक्यात असलेले पाच आपले सरकार केंद्र संचालकांनी ही बाब अर्जाद्वारे २१ ऑगस्ट २३ ला तहसील कार्यालयास कळविली आहे.

मात्र, अद्यापपर्यंत त्याचा छडा यंत्रणेला लागलेला नाही. ही बनावटगिरी तालुक्यात अधिकच फोफावल्याची शक्यता बळावली आहे. (Online fake certificates in Peth taluka Information of aaple sarkar Center Director to Tehsil nashik news)

बोगस विविध दाखले वितरित होत असताना, आमच्या नावाने बोगस दाखले अज्ञातांकडून वितरित होऊन जनतेची दिशाभूल केली जात आहे.

अशिक्षित आदिवासी जनतेची फसवणूक केली जात आहे. हा गंभीर प्रकार असून, दिवसेंदिवस तो वाढताना दिसल्याचे समाजमाध्यमात चर्चा आहे. यास आळा घालण्यासाठी संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.

आमच्या नावाने कोणी बोगस दाखले वितरित करत असेल, तर त्यास आम्ही जबाबदार नसल्याचे पाच केंद्र संचालकांनी अर्जाद्वारे कळविले आहे.

या अर्जासोबत एक जातीचा दाखला, तर चार उत्पन्नांचे दाखले, असे पाच बनावट दाखले जोडले आहेत. मात्र, तालुक्यात किती बनावट दाखले वितरित झाले आहेत, याचा तपास नाही.

तालुक्यात ग्रामपंचायतींसह ६५ आपले सरकार सेवा केंद्रे व ८ सीएससी केंद्रे असून, शहरातच सात ते आठ केंद्रे कार्यरत आहेत. बनावट दाखले वितरित करताना दाखल्यांच्या बारकोडमधील अंकात फेरफार करून नावे व तारखेत बदल करून अल्पवेळेत दाखले दिले जातात.

असे बनावट दाखले देणारे रॅकेट तालुक्यात कार्यरत असून, ते शोधण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असून, त्यांच्यासमोर हे आव्हानच आहे.

"या दाखल्याचे निरीक्षण केल्यावर अनेक त्रुटी निदर्शनास येत आहेत. निरीक्षणाअंती हा दाखला बोगस असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. दाखल्याची सखोल चौकशी होण्यासाठी संबंधितावर गुन्हा दाखल करून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना देण्यात येईल."-आप्पासाहेब शिंदे, प्रांताधिकारी, दिंडोरी-पेठ

"या प्रकरणी संशयितांवर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करून सखोल चौकशी करून, यातील सूत्रधारांना शोधून, त्यांच्यावर कारवाई केली जाईल."-अनिल पुरे, तहसीलदार, पेठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१० मिनिटात वस्तू हातात पोहोचवणाऱ्या Blinkitला FDAचा दणका, छापा टाकताच गोदामातलं दृश्य पाहून अधिकारी चक्रावले

IPL 2027 TRADE: हार्दिक पांड्याला ट्रेड करताय का? CSK, KKR सोडून आणखी ३ फ्रँचायझी उतरल्या शर्यतीत; Mumbai Indians म्हणते...

Marathi News Live Updates: विरोधक चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप करत सत्ताधारी खासदारांचा संसदेकडे मोर्चा

Kumbh Mela Fraud: कुंभमेळ्यात बनावट वर्कऑर्डर, ५०० ते ६०० कोटींची फसवणूक; मंत्री गिरीश महाजन यांनी दिली धक्कादायक माहिती

Ajay Devgn: सिंघम आता ‘क्राईम पेट्रोल’मध्ये! अजय देवगणने १५ भागांचं शूटिंगही केलं; अनुप सोनींची जागा घेणार?

SCROLL FOR NEXT