Farmers applying fertilizer to tomato crop hoping for rain.  esakal
नाशिक

Nashik Agriculture News : जुलै उजाडला, शेतकरी हबकला; पावसाअभावी अवघी 20 टक्के पेरणी

एस. डी. आहिरे

Nashik Agriculture News : अवघ्या सृष्टीचे लेणं असलेल्या पाऊसधारांनी निसर्गाचे रूप पालटून जात धर्तीवर जणू हिरवाईच अवतरते तेव्हा चैतन्याची किनार झळाळून येते.

वरुणराजाच्या कृपेने पीक बहरू लागते, अशा किमयागार जलधारा दडून बसल्याने निसर्गाचे वैभव व पिके होरपळून जात आहेत. तीन नक्षत्रांत झालेल्या थोड्याफार शिडकाव्यानं निफाड तालुक्यात खरिपाची पेरणी झाली. (Only 20 percent sowing due to lack of rain nashik agriculture news)

पण पावसाने नंतर दडी मारल्याने आकाशाकडे झेपावणारे बिजाकुंर हिरमुसले आहेत. जुलै उजाडला तरी सरासरीपेक्षा २८ टक्के एवढाच पाऊस झाल्याने पेरणीचा नांगर रुतला आहे. अवघी २० टक्केच पेरणी झाली असून, शेतकरी हबकला आहे.

निफाड तालुक्यातील खरिप हंगामावर संकटाचे ढग गडद होत चालले आहे. तालुक्यात जून महिन्यात सरासरी १०८ मिलिमीटर पावसाची नोंद होत असते. जुलै महिना उजाडूनही फक्त ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

यंदा पाऊस चांगला बरसेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. त्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाला उधाण आले होते. पूर्वपावसाळी कामे आटोपून शिवार सजवून ठेवलं होते. जमा केलेली पुंजी महागडे बी-बियाणे, खत, औषधी घेऊन शेतकरी राजा खरीप पेरणीसाठी सज्ज झाला होता. पण पावसाची अपेक्षित बरसता अद्याप झालेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

निफाड तालुक्यात अवघी २० टक्के पेरणी झाली आहे. रोहिणी, मृग आणि आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले. नंतर मात्र थोडाफार पाऊस झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. पण पाऊस मात्र मुक्कामाऐवजी फेरफटका मारत असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहे.

निफाड तालुक्यात ४० हजार हेक्टर पेरणीचे उद्दिष्ट असताना अवघी सात हजार ८४७ हेक्टर पेरणी झाली आहे. २० टक्केच पेरणी झाल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. खरिपातील मुख्य पीक असलेले मका तीन हजार ५६० हेक्टर, सोयाबीन चार हजार २३० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाने दांडी मारल्याने पिके कोमेजून दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.

"दर वर्षी सोयाबीनची पेरणी करीत असतो. पण दमदारऐवजी रिमझीम पाऊस पडत आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहे. मुसळधार पावसाची गरज आहे." -प्रकाश वाटपाडे, शेतकरी, पाचोरे वणी

"पावसाने जोरदार हजेरी लावली नसल्याने निफाड तालुक्यात उद्दिष्टापेक्षा २० टक्केच क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गोदाकाठ परिसरात मका, सोयाबीनची पेरणी काही प्रमाणात झाली आहे. पावसाने दमदार हजेरी लावली तर पेरणीला वेग येऊन शिवार बहरेल." -सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी, निफाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

IND vs NZ, 1st ODI: विराट कोहलीचं शतक हुकलं, पण भारतानं मैदान जिंकलं! रोमांचक सामन्यात न्यूझीलंडचा पराभव

Bigg Boss Marathi 6 Live Update: लीलाच्या एजेची राकेश बापटची 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एंट्री

सोशल मीडिया स्टार करण सोनवणेची बिग बॉस मराठी 6 मध्ये धमाकेदार एंट्री, सोनवणे वहिनी घरात राडा घालणार?

Bigg Boss Marathi 6 : बॅकग्राऊंड डान्सर म्हणून स्ट्रगल, मालिकांमधून प्रसिद्धी आता बिग बॉसमध्ये राडा करायला आला आयुष संजीव !

SCROLL FOR NEXT