fund esakal
नाशिक

Nashik News : ‘जिल्हा नियोजन’चा अवघा 32 टक्के खर्च

जिल्हा नियोजन समितीचा आतापर्यंत मंजूर निधीच्या ३२.१५ टक्केच खर्च झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : जिल्हा नियोजन समितीचा आतापर्यंत मंजूर निधीच्या ३२.१५ टक्केच खर्च झाला आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी जास्तीत जास्त निधी खर्च करण्यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. ८) दुपारी बाराला जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक होणार आहे. (Only 32 percent of cost of district planning nashik news)

जिल्हा नियोजन समितीने केलेल्या आराखड्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्याला २०२३-२४ या आर्थिक वर्षात सर्वसाधारण योजनेसाठी ६८० कोटी रुपये, अनुसूचित जमाती घटक योजनेसाठी ३१३ कोटी रुपये, तर अनुसूचित जाती घटक योजनेतून १०० कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

जिल्हा नियोजन समितीला सर्वसाधारण योजनेतून मंजूर निधीपैकी आतापर्यंत जिल्हा वार्षिक योजनेतून ४७६ कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. जिल्हा नियोजन समितीने या निधीतून जिल्हा परिषदेसह इतर कार्यान्वयीन यंत्रणांना ३०४ कोटी रुपये वितरित केले आहेत.

त्यातील जिल्हा परिषदेला १६० कोटी रुपये वितरित केले आहेत, तर प्रादेशिक कार्यान्वयीन यंत्रणांना केवळ १४४ कोटी रुपये वितरित केले आहेत. यापैकी २९८ कोटी खर्च करण्यात आला आहे. एकूण आराखड्याच्या तुलनेत केवळ ३२.१५ टक्केच खर्च केला आहे.

जिल्हा परिषदेला निधी खर्च करण्यास दोन वर्षांची मुदत असली, तरी इतर प्रादेशिक कार्यन्वयीन यंत्रणेला वर्षभराचीच मुदत असते. जिल्हा नियोजन समितीची बैठक साधारणपणे नोव्हेंबरपर्यंत होत असते. या आर्थिक वर्षात नोव्हेंबरमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक झालेली नाही. त्यामुळे पालकमंत्री सोमवारी नियोजन समितीची बैठक घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT