chandwad vad.jpg
chandwad vad.jpg 
नाशिक

चांदवडचे ‘वड’ गेले कुठे? २३ किलोमीटर हद्दीत वडाची अवघी ८० झाडे

भाऊसाहेब गोसावी/हर्षल गांगुर्डे

नाशिक : (चांदवड) चांदवड-मनमाड रोड विस्तारीकरणासाठी शासनाकडून एकूण ४८२ झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली. यात १२ प्रकारची झाडे आहेत. मात्र तोडीनंतर सर्वाधिक डेरेदारपणामुळे मूल्यांकनात जास्त भरणारी पर्यायाने शासनास अधिकचा महसूल देणारी वडाची झाडे मात्र जाणीवपूर्वक कमी दाखविण्यात आली आहेत. 

ही संख्या कमी का दाखविण्यात आली? 

चांदवड-मनमाड रस्त्याच्या दुतर्फा २३ किलोमीटरमध्ये वड- ८०, सिसम- ४, पापडी- १४, निंब- ५९, महारुख- १३, कवठ- २, गुलमोहर- ४, चिंचा- ५, बदाम- १, बाभूळ- ३८, गिलिसिडिया- ३, शिरस- ९ अशी झाडे सर्वेक्षणात दाखविण्यात आली आहेत. प्रत्यक्षात मात्र चांदवडची ओळख सांगणाऱ्या वडाच्या डेरेदार झाडांसह या सर्वच झाडांची संख्या कमी दाखविण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. ही संख्या कमी का दाखविण्यात आली? दाखविण्यात आलेल्या मात्र प्रत्यक्षात जास्त तोड झालेल्या झाडांचा महसूल व पर्यावरणाची हानी यास जबाबदार कोण, हा प्रश्न यानिमित्ताने पडतो. वडाच्या महाकाय वृक्षांचे तोडीनंतरचे लाकूड हे अनेक ठिकाणी उपयोगी असून, जळीत लाकडापेक्षा यास मोठी किंमत मिळते. 

मोठ्या संख्येने असणारे वड गेले कुठे?

वृक्षांची तोड होताना दहा टायर वाहनांतून त्यांची वाहतूक करण्यात आली, शिवाय लाकडे उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला आहे. यावरून या महाकाय वडांच्या तोडीनंतरही त्यांच्या विक्रीतून किती महसूल येऊ शकेल याचा अंदाज येतो. मात्र याच महसुलात घोळ करून मोठे ‘अर्थकारण’ साधण्यात आले असून, यात अडथळा नको म्हणून तालुक्यातील काही लोकांचे हात अगोदरच ओले केल्याची वदंता आहे. चांदवडकरांना वर्षानुवर्षे आपल्या विस्तारित फांद्यांच्या छत्राखाली सुखद अनुभव देणारी मोठ्या संख्येने असणारे वड गेले कुठे? या वंडांशी चांडवडकरांचे नाते अनेक पिढ्यांचे आहे हे सर्वश्रुत, याचीच प्रचीती या वडतोडीबाबत व्यक्त होताना कवी सागर जाधव यांच्या पुढील शब्दांतून येते. 

कवी सागर जाधव यांच्या शब्दांतून...

तू बघितल्या माझ्याआधीच्या चार पिढ्या 
कदाचित त्यापेक्षाही जास्त..! 
पारंब्यांनी अनेकांना दिला आधार 
तुझ्या सावलीने 
कधी जाणवू दिली नाहीत 
आजवर आलेली रखरखीत उन्हं... 
आज तुला पाडताना 
बघत होतो हाताची घडी करून... 
तोवर घरट्यातील चोची झाल्या होत्या निराधार..! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 Team India Squad : हार्दिकला कॅप्टन्सीवरून का हटवलं...? आगरकर गडबडला अन् रोहितनं सावरलं

PM Modi Speech : लव्ह जिहाद, लँड जिहाद, आता वोट जिहाद...; PM मोदींची काँग्रेसवर घणाघाती टीका

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

SCROLL FOR NEXT