Only an average of 20 percent of water reserve is left in 4 dams nashik news esakal
नाशिक

Nashik Water Shortage : पावसाळ्यास दिड महिना उलटूनही तालुक्यातील धरणसाठा 20 टक्केच

दिगंबर पाटोळे

Nashik Water Shortage :  दिंडोरी तालुक्यात असलेल्या सहाही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस नसल्याने मागील वर्षी १७ जुलै २०२२ रोजी ९६ टक्के भरलेली धरणांमध्ये पालखेड धरण (३५ टक्के) वगळता तिसगांव धरण कोरडेठाक तर चार धरणांमध्ये अवघा सरासरी वीस टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे.

दरम्यान पेरण्यांसाठी रिमझिम स्वरुपात पाऊस होत असल्याने  पहिल्या टप्प्यातील जवळपास ७० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहे. (Only an average of 20 percent of water reserve is left in 4 dams nashik news)

जुन महिन्यात तालुक्यात तुरळक स्वरुपात झालेला पाऊस वगळता संपूर्ण महिना कोरडाठाक गेला. गेल्या दहा बारा दिवसांत एक दोन  दिवस बऱ्यापैकी झालेला पाऊस व अधुनमधून रिमझिम स्वरुपात पाऊस होत असल्याने तालुक्यात पेरण्या सुरु झाल्या आहेत.  सोयाबीन, मका, उडीद, मुग यांच्यासह लाल कांदा, टॉमेटो, भात, भाजीपाल्याची बियाने पेरण्यात आली आहे.

पावसाची रिमझीम व उघड झाप यामूळे पेरणी केलेल्या बियान्यांना योग्य वापसा मिळत असल्याने सोयाबिन, टॉमेटोची रोपे, कडधान्या यांची उगवन क्षमता चांगली असल्याचे खोरीफाटा येथील शेतकरी सम्राट राऊत यांनी सांगितले. तर भाताची रोपेही चांगल्या प्रकारे उतरली असून दहा बारा दिवसांत लागवडी योग्या पाऊस झाल्यास भाताची लावणी सुरु होणार असल्याचे पिंगळवाडी येथील पंडीत भरसट यांनी सांगितले आहे.

पेरलेल्या पिकांतील अतर्गंत मशागतीची कामांची तसेच टॉमेटाे लागवडीसाठी ठिकठिकाणी प्लस्टिक पेपर टाकण्याचे कामाची शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे. दरम्यान ठरावीक काही भाग वगळता आतापर्यंत तालुक्यात दमदार पाऊस न झाल्याने तालुक्यातील नदी नाल्यांना थोडे फार प्रमाणात प्रवाहीत झाली अाहे. मात्र दुसरीकडे शेतातील विहीरीत अद्याप पाणी न उतरल्याने विहिरीचा तळ उघडाच असून तालुक्यातील धरणांचा पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यातही अपेक्षीत वाढ झालेली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मागील वर्षी १७ जुलै २०२२ पर्यंत वाघाड, ओझरखेड, तीसगांव ही धरणे शंभर टक्के भरली गेली होती. तर बाकी धरणेही ९० टक्केहून अधिक भरली गेलेली होती. तालुक्यातील ६९५.९० मिमि. वार्षिक सरासरी पर्जन्यमाना पैकी  १ जुन ते १७ जुलै २०२३ अखेर ३३७.३ मि.मी (४१.३ टक्के) पाऊस झाला असून यात १ जुन ते ३० जून २०२३ अखेर तालुक्यात अवघा ७४.२ मि.मी. पाऊस झाला आहे, तर १ जुलै ते १७ जुलै या १७ दिवसांत १९७.१ मि. मी. पाऊसाची नोंद झाली आहे.

दुसरीकडे तालुक्यातील तिसगांव धरण अद्याप पर्यंत कोरडीच असून पालखेड धरणात मे महिन्यात करंजवण धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामूळे धरणात ३५ टक्के पाणीसाठा आहे. मात्र बाकी धरणांमध्ये सरासरी २० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

तालुक्यातील १९ जुलै रोजीचा उपयुक्त जलसाठा द.ल.घ.फु व कंसात टक्केवारी पुढील प्रमाणे :  पालखेड २३९ (३५), करंजवण १३४९ (२५), वाघाड ४१५ (१८), ओझरखेड ५४५ (२६), पुणेगांव १३२ (२१), तिसंगाव ० (०)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं केलं की अमर प्रेम, आम्ही केलं की लव्ह जिहाद का? काँग्रेस, एमआयएमशी युतीवरून ठाकरे बंधूंचा प्रहार

Bigg Boss Marathi 6 Live Update: 'बिग बॉस मराठी ६' मध्ये आला अमरावतीचा बिल्डर

बॉलिवूडमध्ये प्रसिद्धी, शिल्पा शेट्टीच्या बहिणीला केलंय डेट ! मराठी बिग बॉसमध्ये कसा असणार राकेशचा अंदाज ?

Bigg Boss Marathi 6 : घरची गरीबी, थॅलेसेमियाशी झुंज देणाऱ्या रीलस्टार डॉन प्रभू शेळकेची Entry !

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

SCROLL FOR NEXT