grampanchayt elections.jpg 
नाशिक

नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक : कळवण नगरपंचायतीमध्ये सहा नगरसेवकांना पुन्हा संधी 

रविंद्र पगार

कळवण (जि.नाशिक) : नगरपंचायतच्या दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.१०) काढलेल्या आरक्षण सोडतीत शहरातील मातब्बर नेत्यांसह नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना अन्य प्रभागांतून निवडणूक लढवावी लागणार आहे. तर विद्यमान सहा नगरसेवकांना आरक्षणामुळे पुन्हा संधी मिळणार आहे. 

सहा नगरसेवकांना पुन्हा संधी 
नगरपंचायतीच्या १७ सदस्य संख्येसाठी कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना व मुख्याधिकारी डॉ. सचिन पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपंचायत कार्यालयात आरक्षण काढण्यात आले. नगराध्यक्षा रोहिणी महालेसह नगरसेवक, शहरातील नेते, विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित यावेळी होते. आरक्षणाची माहिती प्रशासकीय अधिकारी बंगाळ यांनी दिली तर प्रभाग आरक्षणाची चिठ्ठी हर्ष दुर्गेश कायस्थ या बालकाने काढली. 

प्रभागांसाठी आरक्षण सोडत

अनुसूचित जातीसाठी २ जागा राखीव असून प्रभाग क्र. १० व १४ हे प्रभाग चक्रानुक्रमे आरक्षित झाल्याने चिठ्ठीद्वारे प्रभाग क्र. १४ हे अनुसूचित जातीसाठी तर प्रभाग क्र.१० अनुसूचित जाती स्त्री साठी राखीव झाले. अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्र.२ व ६ हे अनुसूचित जमाती स्त्री राखीव झाले असून निवडणूक निर्देशनुसार चिठ्ठी सोडत न काढता प्रभाग क्र .३ व १६ हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आले. नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी प्रभाग ११ व १७ आरक्षित तर प्रभाग १२, १३ व १५ हे नागरिकांच्या मागास प्रवर्ग स्त्रीसाठी राखीव झाले. 

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

असे आहे आरक्षण 
प्रभाग १ - सर्वसाधारण स्त्री, प्रभाग २ - अनुसूचित जमाती स्त्री, प्रभाग ३ - अनुसूचित जमाती, प्रभाग ४- सर्वसाधारण 
प्रभाग ५- सर्वसाधारण, प्रभाग ६- अनुसूचित जमाती स्त्री, प्रभाग ७-सर्वसाधारण स्त्री, प्रभाग ८- सर्वसाधारण, प्रभाग ९-सर्वसाधारण स्त्री, प्रभाग १०-अनुसूचित जाती स्त्री, प्रभाग ११-नागरिकांचा मागास प्रवर्ग, प्रभाग १२-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, प्रभाग १३-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, प्रभाग १४-अनुसूचित जाती, प्रभाग १५-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, 
प्रभाग १६-अनुसूचित जमाती, प्रभाग १७-नागरिकांचा मागास  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nandigram Bypoll : नंदीग्राम पोटनिवडणुकीआधी मोठी घडामोड; काँग्रेस उमेदवार मिलन प्रधान यांच्यानंतर पक्षातील बड्या नेत्यालाही अटक

Pune University Mess Fee Hike: पुणे विद्यापीठातील मेस दरवाढीचा भार विद्यार्थ्यांवर नको; विद्यापीठाने अनुदान द्यावे: ‘विद्यार्थी संघर्ष कृती समिती’ची मागणी

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : बुलढाण्यात कंटेनर-दुचाकीचा भीषण अपघात; मायलेकाचा जागीच मृत्यू

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

SCROLL FOR NEXT