10th result.jpg 
नाशिक

SSC RESULT 2020 : दहावीच्या टक्‍केवारी वाढीचे 'हे' तर कारण नाही?...वाचा सविस्तर बातमी

अरुण मलाणी

नाशिक : गेल्या वर्षी दहावीच्‍या परीक्षेत लेखी परीक्षेच्या आधारे संपूर्ण मूल्‍यांकन झाल्याने विभागाचा निकाल ७७.५८ टक्‍के लागला. त्‍यापूर्वीचे तीन वर्षे सातत्‍याने ८५ टक्क्‍यांपुढे निकाल लागलेला असल्‍याने परीक्षा पद्धतीतील बदलाचा सर्व स्‍तरावरून विरोध झाला होता. त्‍यात या वर्षी पुन्हा दहावीच्या निकालाच्या टक्‍केवारीने उसळी घेतली आहे. त्याचे हे कारण तर नाही? वाचा सविस्तर बातमी

कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे सरासरी गुणदान

पूर्वी दहावीसाठी वीस गुणांची तोंडी परीक्षा घेतली जायची. परंतु गेल्‍या वर्षी परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आला. त्‍यानुसार मूल्‍यमापन पद्धतीत तोंडी परीक्षेचा समावेश नव्‍हता व केवळ लेखी परीक्षेवर आधारीरित निकाल जाहीर केला होता. यातून गेल्‍या वर्षी विभागाचा निकाल ७७.५८ टक्‍के लागला. मात्र तोंडी परीक्षा रद्द करण्याच्‍या निर्णयाचा विरोध झाल्‍यानंतर मार्च २०२० मध्ये पुन्‍हा तोंडी परीक्षा व लेखी परीक्षेवर आधारित गुणदान करण्यात आले. तर भूगोलाच्या पेपरसाठी कोरोनाच्‍या प्रादुर्भावामुळे सरासरी गुणदान केले. यातून यंदा निकालाच्‍या टक्‍केवारीत वाढ झाली. 

९९.९९ टक्‍के विद्यार्थी 
सामाजिक शास्‍त्रात उत्तीर्ण

 
विभागात सामाजिक शास्‍त्र विषयात तब्‍बल ९९.९९ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्‍यापाठोपाठ कठीण समजल्‍या जाणाऱ्या इंग्रजी विषयात ९९.४४ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर गणित विषयात ९६.२४ टक्‍के, विज्ञान विषयात ९६.५९ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मराठी प्रथम भाषेत ९४.८७ टक्‍के, मराठी द्वितीय, तृतीय भाषेत ९८.४९ टक्‍के, ऊर्दू भाषेत ९४.३६ टक्‍के, हिंदी प्रथम भाषेत ९५.८५ टक्‍के, हिंदी द्वितीय व तृतीय भाषेत ९३.३५ टक्‍के, इंग्रजी द्वितीय व तृतीय भाषेत ९४.१९ टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

गेल्‍या चार वर्षांतील नाशिक विभागाचा निकाल असा- 
वर्ष निकाल 

मार्च २०१६ ८९.६१ टक्‍के 
मार्च २०१७ ८७.७६ टक्‍के 
मार्च २०१८ ८७.४२ टक्‍के 
मार्च २०१९ ७७.५८ टक्‍के 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT