manja 
नाशिक

नायलॉन मांजा वापराल तर खबरदार! महिलेच्या मृत्यूनंतर शहरात मनाई आदेश

विनोद बेदरकर

नाशिक : नाशिक शहरात पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सोमवारी (ता. २८) नायलॉन मांजामुळे मान कापली जाऊन दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासन व्यवस्था जागी झाली आहे.शहर पोलिसांनी शहरात २८ जानेवारीपर्यंत नायलॉन मांजा वापराला प्रतिबंध करण्याचा मनाई आदेश काढला आहे. उपायुक्त विजय खरात यांनी या संदर्भातील अधिसूचना काढली. 

त्यानुसार शहरात उपाय म्हणून पतंग उडविण्यासाठीच्या मांजासाठी नायलॉन दोरा निर्मिती, ज्या माजाला काचेचे कोटिंग आहे, त्याच्या साठा व वापरावर मनाई करण्यात येत आहे. मकरसंक्रांतीनिमित्त शहरात उडविल्या जाणाऱ्या पतंगांना वापरण्यात येणारा मांजा नायलॉन दोऱ्याचा असल्याचे निदर्शनास आले आहे.

असा वन्य पशुपक्षांसाठी धोकादायक

पतंग उडविताना दोन पतंगांत पेज झाल्याने तुटलेला दोरा झाडे व इमारतीमध्ये अडकतो व त्यामुळे वन्य पशुपक्षी जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. तसेच या मांजामुळे रस्त्याने जाणारे दुचाकी वाहनचालक व शाळेतील सायकलवरील विद्यार्थी हे अपघात होऊन जखमी होऊ शकतात. नायलॉन मांजा तुटला जात नाही व त्याचा नाशही होत नसल्याने तो पर्यावरणाससुद्धा हानिकरक ठरत आहे. त्यामुळे अशा मांजा वापराच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय दंडसंहिता १९६० या कायद्याच्या कलम १८८ नुसार कारवाई होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG : भारत-अफगाणिस्तान पहिला सामना १३ ऐवजी १४ सप्टेंबरला? पोलिसांच्या पत्रानंतर काय निर्णय झाला? महत्त्वाच्या अपडेट्स

Marathi News Live Updates : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला

केंद्राचा आदेश पण कर्नाटक भूमिकेवर ठाम! काँग्रेसच्या १९३७ सालच्या ठरावाचं होणार पालन, DK सरकारचा आदेश नेमका काय?

Bail Pola Festival : जात-पात विसरून एकाच माळेत; अमळनेर वस्तीत हिंदू-मुस्लिम बांधवांचा बैलपोळा उत्साहात

MPSC paper leak confession : व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे, हे आम्हीही मान्य करतो ; आमदार विक्रम पाचपुते यांची स्पष्टोक्ती

SCROLL FOR NEXT