Police Commissioner Sandeep Karnik visited village deity Kalikadevi temple on Friday, while Keshav Anna Patil, president of the organization welcomed him. 
नाशिक

Nashik Police Commissioner: संघटित गुन्‍हेगारीचा बीमोड ॲन्‍टी टेररिस्‍ट सेल करणार सक्रिय : संदीप कर्णिक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Police Commisioner: नागरिकांना सुरक्षित व भयमुक्‍त वातावरणात वावरता यावे, यावर भर असणार आहे. एकीकडे संघटित गुन्‍हेगारीचा बीमोड करताना दुसरीकडे ॲन्‍टी टेररिस्‍ट सेल सक्रिय करत गुन्‍हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्‍न केले जातील, अशी ग्‍वाही नवनियुक्‍त पोलिस आयुक्‍त संदीप कर्णिक यांनी शुक्रवारी (ता. २४) दिली.

गंगापूर रोडवरील पोलिस आयुक्‍त कार्यालयातील दालनात त्‍यांनी अंकुश शिंदे यांच्‍याकडून आयुक्‍तपदाचा कार्यभार स्‍वीकारला. त्‍यानंतर त्‍यांनी आगामी योजनांबाबत सविस्‍तर माहिती दिली. (Organized Crime B Mode Anti Terrorist Cell will be activated by police commissioner nashik news)

श्री. कर्णिक म्‍हणाले, की प्रत्‍येक शहरात पोलिसांची वेगळी कार्यशैली असते. अधिकारी वर्गासोबत बैठक घेताना नाशिक पोलिस दलाच्‍या कार्यपद्धतीचा आढावा घेत, त्‍यानंतर धोरण ठरविले जाईल. सुरवातीच्‍या टप्प्‍यात नागरिकांना सुरक्षित व भयमुक्‍त शहर उपलब्‍ध करून देण्यावर भर राहणार आहे.

पोलिस ठाणे स्‍तरावर ॲन्‍टी टेररिस्ट सेल तर आयुक्‍तालयाच्‍या स्‍तरावर ॲन्‍टी टेररिस्ट ब्रँचचे कामकाज सक्रिय केले जाईल. एमडी ड्रग्‍स प्रकरणाविषयी ते म्‍हणाले, की पुणे, मुंबई व नाशिक पोलिसांनी त्‍यांच्‍या स्‍तरावर आक्रमक कारवाई केलेली आहे. या प्रकरणाच्‍या मुळापर्यंत जाण्याच्‍या दिशेने आगामी काळात तपास केला जाईल.

कोअर पोलिसिंग देणार टेलरमेट रिस्‍पॉन्‍स

कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राहाण्यासाठी एकीकडे कोअर पोलिसिंगवर भर देताना त्‍यासोबत टेलरमेड रिस्‍पॉन्‍सवर लक्ष केंद्रित केले जाईल. या माध्यमातून शहरातील विविध उपनगरीय भागांच्‍या गरजा लक्षात घेऊन त्‍यानुसार आणखी केली जाईल. पुण्याच्‍या धर्तीवर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी 'सीपी व्‍हॉटॲप नंबर' जारी करताना नागरिकांकडून तक्रारी, सूचना मागवत त्‍यावर काम करणार असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

महिलांना सुरक्षा, बालगुन्‍हेगारी रोखण्याचे प्रयत्‍न

शहरात महिलांना सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर असेल. संघटित गुन्‍हेगारीसह ‘स्‍ट्रीट क्राइम’ आटोक्‍यात आणला जाईल. बालगुन्‍हेगारी रोखण्यासाठी प्रयत्‍नशील राहणार असल्‍याचेही श्री. कर्णिक यांनी सांगितले.

कालिकादेवीचे दर्शन

संदीप कर्णिक यांनी पोलिस आयुक्‍तपदाची जबाबदारी स्‍वीकारण्यापूर्वी मुंबई नाक्‍यावरील कालिकादेवीचे दर्शन घेतले. मंदिरात दाखल होताना त्‍यांनी विधिवत पद्धतीने पूजन केले. यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्‍हणाले, की पहिल्‍या नियुक्‍तीपासून ज्‍या शहरात जातो, तेथील ग्रामदेवतेचे दर्शन घेत असतो. नाशिक शहरात काम करण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्‍य समजतो' अशी भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

नाशिकमध्ये मिळाली सकारात्‍मक ऊर्जा ः अंकुश शिंदे

शहरातील गुंडगिरी, गुन्‍हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी नेहमीच प्रयत्‍न केले. त्‍यात बहुतांशी यशदेखील आले आहे. बदली हा प्रत्‍येक अधिकाऱ्याच्या जीवनातील अविभाज्‍य अंग आहे. नाशिकमध्ये सकारामक ऊर्जा मिळाल्‍याची भावना मावळते पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांनी व्‍यक्‍त केली. ते म्‍हणाले, की अकरा महिन्‍यांचा कार्यकाळ समाधानकारक राहिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT