anath.jpg 
नाशिक

अनाथ मुलांना मिळणार ओळखपत्र; जिल्ह्यात अनाथ मुलांचा होणार शोध 

अंबादास शिंदे

नाशिक रोड : जिल्ह्यातील अनाथ मुलांना ओळखपत्र मिळावित, यासाठी १४ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवडा साजरा होणार असून, त्यात अनाथ मुलांना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यात बालगृहातील अनाथ मुलांच्या आई-वडील, नातेवाइकांचा शोध घेतला जाणार आहे. महिला व बालविकास अधिकारी अजय फडोळ यांनी ही माहिती दिली. 

अनाथ मुलांच्या पालकांचा घेणार शोध
रस्ता, मंदिर किंवा अन्यत्र आढळेलेली अनाथ बालके बालगृहात दाखल केली जातात. ज्यांना पालक नाहीत, किंवा जबाबदारी घेण्यास नातेवाईक तयार नाहीत, त्या मुलांना बालगृहात ठेवले जाते. त्यांची शिक्षण, संगोपनासह संपूर्ण काळजी घेतली जाते. अशा मुलांना शिक्षण देऊन बालगृहातून बाहेर पडल्यानंतर विविध प्रकारचे दाखले मिळण्यास अडचणी येतात. जातीचा दाखलाही मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या विविध योजना, नोकऱ्यांपासून ते वंचित राहतात. यामुळे शासनाने अशा अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये आई-वडील, नातेवाईक असे कोणीच नसलेली मुले आणि नातेवाईक असलेली अनाथ मुले असे दोन भाग आहेत. दोन्हींना प्रमाणपत्रे दिली जातात. मात्र, आई-वडील, नातेवाईक कोणीच नसलेल्या अनाथ प्रमाणपत्रधारकांना शासकीय नोकरीत एक टक्का आरक्षण दिले जाते. अनाथ प्रमाणपत्र पंधरवड्यात बालगृहातील अनाथ मुलांच्या पालकांचा शोध घेतला जाणार आहे. 

प्रस्ताव पाठवणार 
बालगृहाचे अधीक्षक हे जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांकडे प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल करतील. सत्यता पडताळून हे प्रस्ताव विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभागाकडे पाठविण्यात येतील. त्यांच्या मंजुरीनंतर प्रमाणपत्रे दिले जाईल. 

उपयुक्तांकडे आलेले प्रस्ताव - १३ 
बालकल्याण समितीकडे प्रस्ताव - एक 
त्रुटी पूर्ततेसाठी पाठविलेले प्रस्ताव - सहा  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra 12th Result 2026 : बारावीचा निकाल जाहीर! कोकण अव्वल, लातूर पिछाडीवर, मुलींचा यशाचा टक्का मुलांपेक्षा ६.३५ ने अधिक

Pune Bhor Child CCTV Video : पुण्यातील अत्याचार करून हत्या केलेल्या ४ वर्षीय चिमुकलीला नेताना सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

Mumbai Family Death Mystery : कलिंगडात विष नव्हतं, मग मृत्यू कसा झाला? मुंबईतील डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ वाढलं, FDA चा धक्कादायक अहवाल समोर

HSC Result: बारावीनंतर नोकरी करायची आहे ? रेल्वेमध्ये करा उत्तम करिअर, टीटीई होण्यासाठी अशी करा तयारी

Mumbai Crime: १,७४५ कोटी रुपयांचे कोकेन महामुंबईत जप्त, एनसीबीची सर्वात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT