downy.jpg 
नाशिक

४० वर्षांमध्ये द्राक्षांवर डाउणीचा मोठा प्रादुर्भाव...वाचा द्राक्ष सल्लागाराचे मत...

महेंद्र महाजन

नाशिक : गेल्या ४० वर्षांमध्ये पहिल्यांदा डाउणीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. वेलीवर आलेले पान कसे टिकवायचे आणि ऑक्टोबरमध्ये छाटणी कशी करायची? याचा विचार करावा लागणार आहे. डाउणीच्या प्रतिबंधासाठी पार्श्‍वभूमी समजावून घ्यावी लागेल, असे द्राक्ष सल्लागार अनिल म्हेत्रे यांनी स्पष्ट केले. 

अन्नद्रव्यांचा योग्य वापर करून रोगावर नियंत्रण

कृषिथॉन आणि द्राक्ष विज्ञान मंडळाच्या वेबिनारमध्ये ते बोलत होते. देशात थॉमसन सीडलेस, किसमिस चोर्णी, फ्लेम सीडलेस, तास ए-गणेश, सोनाका या जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे सांगून ते म्हणाले, की डावणी मिल्ड्यूवर कामाचे योग्य नियोजन, जैविक नियंत्रण, रासायनिक बुरशीनाशकांचा वापर, अन्नद्रव्यांचा योग्य वापर करून रोगावर नियंत्रण मिळविता येते. एप्रिल छाटणीमधील डाउणी नियंत्रणासाठी काही बाबी लक्षात ठेवाव्या लागतील. सुपर सबकेन, हाय स्पीड ब्लोअर, चिखलामध्ये ट्रॅक्टरचा वापर, नवीन वाढणारे शेंडे, आंतरप्रवाही औषधांचा वापर, पाने ओली असताना जखमा, कीडी, भुसभुशीत व जैविकदृष्ट्या जिवंत जमीन, फॉस्फरस, कॅल्शिअम व बोरोन संलग्न स्प्रे, कटिंग अगोदर बेसल डोसमधील नायट्रोजनचा वापर, कमी कालावधीत पक्क्या होणाऱ्या व्हरायटी यांचा समावेश आहे. 

समस्यांच्या मुळाशी जाऊन आता आपल्याला उपाययोजना करणे गरजेचे आहे. देशातील द्राक्ष उत्पादनापैकी राज्यात जवळपास ८५ टक्के हिस्सा असून, महाराष्ट्रात पिकणाऱ्या द्राक्षांत पुणे, सांगली, सातारा, नगर, सोलापूर, नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. सद्यःस्थितीत द्राक्षबागांमध्ये शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते, असेही त्यांनी सांगितले. द्राक्ष विज्ञान मंडळाचे डॉ. वसंत ढिकले यांनी प्रास्ताविक केले. साहील न्याहारकर यांनी आभार मानले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT