abandoned green gym esakal
नाशिक

Nashik News : उघड्यावरील ग्रीन जिम झाल्या खेळण्याचे साहित्य! देखभाल दुरुस्तीची गरज

संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : शहरवासीयांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तब्बल २३ ठिकाणी क्रीडा विभागाकडून तसेच दहा ते पंधरा ठिकाणी आमदार व इतर निधीतून ग्रीन जिम कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

या जिममुळे अनेकांना व्यायामाची सवय लागली खरी; पण बहुतांश जिम उघड्यावर अन् कानाकोपऱ्यात थाटल्या आहेत. बसविल्यानंतर त्याची देखभाल दुरुस्ती काळजी कोणीही घेत नसल्याचे दिसते.

किंबहुना काही ठिकाणी, तर फक्त लहान मुले खेळण्यासाठी या जिमचा वापर करत आहेत. त्यामुळे पालिकेने या जिमच्या अवतीभवती भौतिक सुविधा करण्याची गरज आहे. (Outdoor green gyms become playing toys Need for maintenance repairs at yeola Nashik News)

बदलत्या लाइफस्टाइलमध्ये आरोग्याचे प्रश्न वाढत असल्याने फिटनेस ही संकल्पना आता प्रत्येकाच्याच अंगवळणी पडू लागली आहे. यासाठी जिमपासून ते मॉर्निंग वॉकचे अनेक पर्याय वापरले जात आहेत.

शहरातील वाढती संख्या बघता व व्यायामाबाबत अधिक जनजागृती करण्यासह नागरिकांना व्यायामासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रीन जिम ही संकल्पना पुढे आली आहे.

सर्वात अगोदर माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून नागरिक फिरण्यासाठी जातात तेथे ग्रीन जिम बसविण्यात आल्या आहेत. तहसील कार्यालय, अंगणगाव येथील बोटिंग क्लब अशा विविध ठिकाणच्या ग्रीन जिमचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे.

हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...

याच धर्तीवर विविध ओपन स्पेस, उद्यानांमध्ये नियमितपणे सकाळचा व्यायाम करणाऱ्यांकरिता खुल्या आकाशाखाली खास उद्यानात व्यायामाची साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामध्ये आबालवृद्धांकरिता स्काय वॉकर, लेग प्रेस, एअर वॉकर शेवर, चेस्ट प्रेस, सर्फ बोर्ड, सीट अप बोर्ड, सिटिंग आणि स्टॅण्डिंग ट्विस्टर आदी साधनांचा यात समावेश आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या ग्रीन जिम साहित्यातून पालिकेने शहरातील विविध वसाहतींमधील ओपन स्पेस अर्थातच खुल्या जागांमध्ये ग्रीन जिम विकसित केल्या आहेत. जवळपास २३ ठिकाणी या ग्रीम जिम उभारण्यात आल्या आहेत.

विविध ठिकाणी महिलांसह पुरुषही या जिमचा वापर करतात. मात्र अगदी अडगळीच्या ठिकाणी जागांची निवड करण्यात आल्याने ग्रीन जिम खितपत पडल्या आहेत. किंबहुना नववसाहतीतील काही भागात तर या जिम लहान मुलांच्या खेळण्यासाठी सर्रास उपयोगात आणल्या जात असल्याचे चित्र आहे.

पालिकेने विशेष बाब म्हणून शहरातील विविध ठिकाणच्या या ग्रीन जिमला संरक्षक भिंत बांधावीत. ग्रीन जिम असलेल्या ओपन स्पेसची दुरवस्था झाल्याने परिसरातील नागरिकही ग्रीन जिमकडे पाठ फिरवत आहेत. ओपन स्पेसमध्ये पेव्हर ब्लॉक बसवावेत अथवा लॉन्स विकसित करावे, जेणेकरून नागरिकांचा या ग्रीन जिमकडे ओढा वाढेल, अशी मागणी होत आहे.

ग्रीन जिम ठरताहेत शोभेच्या वस्तू

व्यायामासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ग्रीन जिम भौतिक सुविधांअभावी खेळण्याचे साहित्य आणि शोभेच्या वस्तू झाल्याने याकडे विशेष लक्ष पुरविण्याची गरज आहे.

अन्यथा आगामी काही वर्षातच या जागेवर जिमचे साहित्य सापडेल की नाही, हाही प्रश्न गमतीने केला जात आहे. या ग्रीन जिम असलेल्या ओपन स्पेसभोवती संरक्षण भिंतच नसल्याने येथे डुकरांसह मोकाट जनावरांचा सातत्याने संचार होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT