suicide servant.jpeg
suicide servant.jpeg 
नाशिक

कुटुंबियांची व्यथा.. "आधी कारवाई...मगच मृतदेहावर अंत्यसंस्कार".. 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नोकराकडून वारंवार पैसे घेऊन आणि त्याच्या नावावर कर्ज काढून मालक फरारी झाला. त्याचा मानसिक त्रास सहन न झाल्याने विषारी औषध सेवन करून नोकराने आत्महत्या केली. याप्रकरणी जोपर्यंत संशयितांना अटक केली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्याच्या कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र संशयितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन मिळाल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

नोकराने मांडली चिठ्ठीतून व्यथा...

चव्हाटा भागातील चर्मकार लेन येथील जयेश एखंडे (वय 28) असे नोकराचे नाव आहे. पोलिसाना पंचनाम्यादरम्यान जयेशने लिहिलेली चिठ्ठी सापडली होती. त्यात त्याने मालक राहुल इसराणी याने वेळोवेळी त्याच्याकडून उसनवारी पैसे घेतले होते. इतकेच नव्हे, तर त्याच्या नावावर कर्जही काढले होते. काही महिन्यांपासून संशयित राहुल फरारी झाला आहे. संशयिताचा भाऊ कमलेश इसराणी आणि मेहुणा प्रवीण बैस यांनीच राहुलला गायब केल्याचे चिठ्ठीत लिहिले आहे. त्याचा मानसिक त्रास होत असल्याने आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीतील मजकुरात म्हटले आहे. 

पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला

भद्रकाली पोलिस जिल्हा रुग्णालयात जयेशच्या कुटुंबीयांची वाट पाहत थांबले होते. बराच वेळ होऊनही कुणी येत नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. पोलिसांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संशयितांवर निश्‍चित कारवाई केली जाईल. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करणार असल्याचे आश्‍वासन दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: नारायणचे दमदार अर्धशतक, तर रमनदीपची अखेरीस तुफानी फटकेबाजी; कोलकाताचे लखनौसमोर 236 धावांचे लक्ष्य

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

SCROLL FOR NEXT