banchhode.jpg 
नाशिक

खरंच की काय..."करन्सी''ला थेट स्पर्श न करता 'ते' करताय व्यापार?...कसं ते वाचाच

सोमनाथ कोकरे

नाशिक : पहिलं लॉकडाउन सुरू झालं अन्‌ नोटेच्या माध्यमातूनही कोरोनाचा संसर्ग होतो, अशा आशयाचा व्हिडिओ व्हायरल झाला. अन् त्या दिवसापासून नोटांना हात लावणे बंद झालं...अन् श्री. बनछोडे यांनी मग "करन्सी'ला थेट स्पर्श न करता व्यापार करण्याचा पर्याय शोधला. ग्राहकाकडून लांब चिमट्याने नोटा घेतल्यावर ते इस्त्री करतात अन्‌ मग गल्ल्यात ठेवतात. चिमट्याने नोटा घेऊन इस्त्री केली जाते म्हटल्यावर नाण्यांचं काय? असा स्वाभाविक प्रश्‍न निर्माण होतो. त्यावरही पर्याय शोधला आहे.

अण्णांचा गल्ला दहा हजारांचा 

पंचवटी पोलिस ठाण्यासमोरील ओम दुग्धालय अन्‌ स्वीटसचे मालक महेश बनछोडे यांनी "करन्सी'ला थेट स्पर्श न करता व्यापार करण्याचा पर्याय शोधला. दूध आणि मिठाईच्या माध्यमातून रोज सकाळी व सायंकाळी आठ ते दहा हजारांचा अण्णांचा गल्ला आहे. ग्राहकांकडून लांबट चिमट्याने नोटा घेतल्यावर शेजारीच बाकावर कापड टाकून त्यांनी इस्त्रीची सोय केली आहे. नोटांवरून इस्त्री फिरवल्यावर थोडासा धूर तयार होतो. मात्र नोटा कडक होतात. इस्त्रीने नोटांचे आयुष्य वाढते, असे अण्णा ग्राहकांना आवर्जून हसतमुखाने सांगतात. त्यांच्या गल्ल्यातली प्रत्येक नोट एकदम कडक अन्‌ करकरीत असतात. चिमट्याने नोटा घेऊन इस्त्री केली जाते म्हटल्यावर नाण्यांचं काय? असा स्वाभाविक प्रश्‍न निर्माण होतो. त्यावरही श्री. बनछोडे यांनी पर्याय शोधला आहे. सॅनिटायझरमध्ये नाणी टाकून मग ती गल्ल्यात ठेवली जातात. ग्राहक त्यांना "अण्णा' या टोपण नावाने संबोधतात. 
माझ्याकडील निर्जंतुक नोटा अथवा नाणी घेणाऱ्याला आनंद होतो, असेही अण्णा म्हणतात. 

महेशअण्णा करतात ते बरोबरच

दिंडोरी रोडवर वीस- पंचवीस वर्षांपासून अण्णांचे हे दुकान आहे. येथे सकाळी व सायंकाळी ग्राहकांची भली मोठी रांग लागते. त्यांचे सर्वच ग्राहक नियमित येणारे असल्याने प्रत्येकाची नावनिशी ओळख झाली आहे. कितीही गर्दी असली, तरी एकाही नोटेला हात न लावता ती स्वीकारली जाते. हे त्यांच्या ग्राहकांनाही माहिती झाले आहे. सुरवातीला ग्राहकांना आश्‍चर्य वाटले; पण आता कोरोना परिस्थिती लक्षात आल्यावर महेशअण्णा करतात ते बरोबरच आहे, असेच सर्वांना वाटते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT