oxygen esakal
नाशिक

आता प्राणवायूचा काळा बाजार? रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची दिवसभर वणवण

दाखल रुग्‍णांच्‍या नातेवाइकांना ऑक्सि‍जन व्‍यवस्‍थेची रुग्‍णालयांची विनवणी

अरूण मलानी

नाशिक : कोरोनाच्‍या वाढत्‍या प्रादुर्भावात अत्‍यावस्‍थ रुग्‍णांना उपचारासाठी ऑक्सि‍जनची भीषण टंचाई जाणवू लागली आहे. या परिस्‍थितीचा काही अपप्रवृत्तींकडून गैरफायदा उचलत थेट ऑक्सि‍जनचा काळा बाजार केला जात आहे.

ऑक्सि‍जनची टंचाई गंभीर समस्‍या

रेमडेसिव्‍हिरपाठोपाठ आता ऑक्सि‍जनची टंचाई गंभीर समस्‍या धारण करत आहे. उपचारार्थ रुग्‍णांना लागणाऱ्या ऑक्सिजनच्‍या तुलनेत उपलब्‍धता अत्‍यंत कमी असल्‍याने जिल्‍हा प्रशासनदेखील हतबल झाले आहे. गेल्‍या काही दिवसांपासून वैद्यकीय क्षेत्राशी निगडित संघटना व प्रशासकीय यंत्रणेच्‍या बैठकीच्‍या फैरी सुरू आहेत. सोमवारी (ता. २६) देखील जिल्‍हा प्रशासनासोबत आयएमएची बैठक झाल्‍याचे सांगण्यात आले. या बैठकीत सध्या उपलब्‍ध ऑक्सिजनच्‍या सुरळीत वाटपाबाबत चर्चा झाली.निर्धारित रकमेपेक्षा अधिकची माहिती काहींकडून केली जात असल्‍याचे काही डॉक्‍टरांनी नाव न सांगण्याच्‍या अटीवर सांगितले. त्‍यामुळे प्राणवायूची काळा बाजार रोखण्याचे आव्‍हान प्रशासकीय यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे.

रुग्‍णांच्‍या नातेवाइकांची दिवसभर मरमर सुरू

रुग्‍णालयांना ऑक्सि‍जन उपलब्‍धतेअभावी आता दाखल रुग्‍णांकरिता ऑक्सि‍जनची व्‍यवस्‍था करण्याची विनवणी त्‍यांच्‍या नातेवाइकांना केली जात आहे.परंतु प्रत्‍यक्षात दिवसभर ऑक्सिजन उपलब्‍धतेसाठी रुग्‍णालयांचा संघर्ष सुरू राहिला. काही रुग्‍णालयांनी तर चढ्या दरांनी ऑक्सिजन खरेदी करत रुग्‍णांना उपलब्‍ध करून दिले. त्‍यामुळे आता प्राणवायूच्‍या काळा बाजार रोखण्याचे आव्‍हान प्रशासकीय यंत्रणेपुढे आहे. हतबल झालेल्‍या रुग्‍णालयांकडून रुग्‍णांच्‍या नातेवाइकांनाच थेट ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी साकडे घातले जाते आहे. रिकामा सिलिंडर घेऊन नातेवाइकांकडून शहरातील विविध एजन्‍सीच्‍या ठिकाणी ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्‍न सुरू आहे.

बेड फुल‍चे कारण देत रुग्‍ण दाखल करण्यास नकार

ऑक्सिजनच्‍या तुटवड्याच्‍या समस्‍येमुळे रुग्‍णालयात दाखल होणाऱ्या अत्‍यवस्‍थ रुग्‍णांना हाल सोसावे लागत आहेत. नव्‍याने दाखल रुग्‍णांकरिता ऑक्सिजनच नसल्‍याने बेड फु‍ल आहेत, असे कारण सांगत रुग्‍ण दाखल करून घेण्यास अनेक रुग्‍णालये नकार देत आहेत. महापालिकेच्‍या संकेतस्‍थळावर बेड उपलब्‍ध असल्‍याचे दाखविले जात असताना प्रत्‍यक्षात रुग्‍णालयांकडून नव्‍याने रुग्‍ण दाखल करण्यास नकार दिला जातो आहे.

प्रशासकीय पातळीवर सातत्‍याने बैठकीतून ऑक्सिजनच्‍या सुरळीत वाटपाबाबत चर्चा सुरू असून, लवकरच याबाबत सुसूत्रता येणे अपेक्षित आहे. सध्या तरी रुग्‍णालये ऑक्सिजनच्‍या तुटवड्याच्‍या समस्‍येला सामोरे जात आहेत. दाखल रुग्‍णांनाच ऑक्सि‍जन उपलब्‍ध होत नसल्‍याने नवीन रुग्‍णांची जबाबदारी घ्यावी कशी, असा प्रश्‍न उपस्‍थित होतो आहे.- डॉ. हेमंत सोननीस,अध्यक्ष, आयएमए नाशिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT