2Bytco_20Hospital.jpg 
नाशिक

'हे तर बिटको हॉस्पिटलला उशिरा सुचलेले शहाणपण...!' मनसे व शिवसेनेकडून आरोप; पाहा व्हिडिओ

हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक : (नाशिक रोड) येथील महापालिकेच्या बिटको हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची सुविधा नाही. त्यामुळे रुग्णालयातील कोविड सेंटरजवळच आता ऑक्सिजन टाकी खोदण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. 'प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण' अशा शब्दात पदाधिकाऱ्यांनी उपक्रमाचे स्वागत केले. 

तर काही जीव वाचले असते...

बिटको रुग्णालयात ऑक्सिजनच्या नळकांड्या पंक्चर असल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळत नाही. बिटको हॉस्पिटलमध्ये शेकडो लोक उपचाराला येतात. मात्र येथे ऑक्सिजनची व्यवस्था नसल्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागते. ही गैरसोय विचारात घेऊन प्रशासनाने अत्यवस्थ लोकांच्या सोयीसाठी ऑक्सिजन टॅंक तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, रुग्णांच्या सेवेसाठी ऑक्सिजन टँक खोदण्याचा घेतलेला निर्णय चांगला असला तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. आधीच ही सोय केली असती, तर काही जीव वाचले असते, अशी टीका माजी नगरसेवक व मनसेचे कार्यकर्ते अस्लम मनियार आणि श्‍याम गोहाड यांनी केली आहे. 

संपादन - किशोरी वाघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Crime Case : एरंडेच्या कार्यालयात प्राण्यांचे अवयव; पेनड्राइव्हमध्ये सात महिलांचे 120 व्हिडिओ; महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती

Latest Marathi News Live Update : विवाहितेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू बाबाला नागपूर पोलिसांनी केली अटक

Nanded News: जल जीवनची ६० टक्केच कामे पूर्ण; अनेक गावांवर पाणीटंचाईचे मळभ; आडात आहे, पण पोहऱ्यात येईना

Latur News: दापका राजा ते जळकोट रस्त्याची दुरवस्था; दोन जिल्ह्यांना जोडणारा प्रमुख मार्ग; वाहनधारकांसह स्थानिक नागरिक त्रस्त

Orion Spacecraft Mission: अपोलो १३ चा विक्रम मोडला, चांदोमामाच्या मागे लपले ओरायन

SCROLL FOR NEXT