नाशिक : देश - विदेशातून हजारो कोटींची आयात होत असली तरी, देशात पाच राज्यातील दोन ठिकाणी आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनल सेवा होती. पण आता नशिकच्या ओझर विमानतळाला 'इंटरनॅशनल कुरिअर हब' करण्याला केंद्राने मान्यता दिली असून येत्या सहा महिन्यात ओझरहून इंटरनॅशनल कुरिअरसेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
सहा महिन्यात कुरिअर सेवा सुर होणार
ओझर विमानतळावरील कुरिअर हबला मान्यतेसंदर्भात काही वर्षांपासून खासदार गोडसे यांचा पाठपुरावा सुरु होता. केंद्र शासनाने पत्र दिले आहे. सून इंटरनॅशनल हबला केंद्राने मंजुरी दिली आहे. देशातील १३ तर महाराष्ट्रात मुंबई विमानतळांवरुन इंटरनॅशनल कुरिअर सेवा सरु होती. नाशिकचा वाढता विकास व औद्योगिक क्षेत्रातील वाहतुकीसाठी मुंबईला जावे लागत मात्र केंद्राने नाशिक कुरिअर हबला मान्यता दिल्याने नाशिक येथून गुजरात, बडोदा, वापी, बलसाड यांसह अन्य भागातील कुरिअर नाशिक विमानतळावरुन जाण्यास सुरुवात होणार असल्याचे खासदार गोडसे यांनी सांगितले.
५० टन वाहतूक क्षमता
ओझर विमानतळावरील कुरिअर हब हे राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे कुरिअर टर्मिनल हब साकरले जाणार असून ओझरहून देशात आणि विदेशात कुठेही कुरिअर पाठविता येणार आहे. सुरुवातीला रोज एक विमानाने कुरिअर सेवा सुरु होईल. त्याची क्षमता दहा टन असणार असून लवकरच इतर कुरिअर कंपनी यात सहभाग होत ही क्षमता दिवसाला ५० टनांवर पोहचणार आहे. येत्या सहा महिन्यात इलेक्ट्रॉनिक वस्तू एक्सपोर्ट, सॅम्पल, गिफ्ट, कागदपत्रांसह अन्य सामानाची सहज जलदगतीने देवाणघेवाण करण्यास सुरुवात होणार आहे.
हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?
देशात मुंबई व अहमदाबाद येथून ही सेवा सुरु होती. ओझर विमानतळाला 'इंटरनॅशनल हब' म्हणून मान्यता मिळाल्याने ते राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे इंटरनॅशनल कुरिअर हब ठरणार आहे. त्यामुळे नाशिकहून जलदगतीने विदेशात कुरिअर सेवा पोहचविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ओझरला काग्रो कस्टम सेवा असल्याने यापुढील काळात नाशिकमधून ही सेवा पुरविली जाणार असल्याने नाशिकच्या विकासात भर पडणार आहे. - हेमंत गोडसे, खासदार नाशिक
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.