saptashrungi Devi News
saptashrungi Devi News esakal
नाशिक

Saptashrung Gad | श्री सप्तशृंगी देवी दर्शनाकरिता सशुल्क VIP दर्शन पास सुरु : विश्वस्त मंडळाचा निर्णय

दिगंबर पाटोळे

वणी ( नाशिक) : महाराष्ट्रातील शक्तीपीठापैकी आद्यस्वयंभू शक्तीपीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील आदिमायेचे दर्शनासाठी व्हिआयपी दर्शन सशुल्क करण्यात आले असून सोमवार, १३ फेब्रुवारी पासून प्रती व्यक्ती १०० रुपयाचे पास घेवून व्हिआयपी दर्शन घेता येणार आहे.

सह्याद्री पूर्व - पश्चिम पर्वत रांगेत, डोंगर पठारावर असलेल्या सप्तशृंगी गडावर वर्षभरात लोखो पर्यावरण, निसर्ग प्रेमी तथा भाविक हे वर्षभरात हजेरी लावत असतात समुद्र सपाटीपासून सुमारे ४६०० फुट उंचीवर असून लाखो भाविक हे श्री भगवती सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. (Paid VIP Darshan Pass for Sri Saptashrungi Devi Darshan Pass Decision of Board of Trustees nashik news)

श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट या विश्वस्त संस्थेने भाविकांच्या सेवा-सुविधा दिवसेंदिवस अधिक अधिक श्री भगवती दर्शन व्यवस्था सुलभ होण्या करिता तथा त्या अंतर्गत दर्शन व्यवस्थेसह अल्पदरात केली असून, वर्षभरातील चैत्र व नवरात्र उत्सव पौर्णिमा त्याच बरोबर मंगळवार, शुक्रवार व रविवार इत्यादी दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी असते.

सदर गर्दीचे नियोजन व नियंत्रण होणेकामी मा. अध्यक्ष व विश्वस्त मंडळाने प्रति व्यक्ती रु. १००/- प्रमाणे श्री सप्तशृंगी मातेचे सशुल्क दर्शन सुविधा सोमवार, दि. १३/०२/२०२३ पासून कार्यान्वित करण्यात येणार असून सदरची सुविधा ही भाविकांसाठी संपूर्णतः ऐच्छिक असून भाविकांना सर्वसामान्य दर्शन व्यवस्था आहे तशी उपलब्ध असेल.

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

ऐच्छिक सशुल्क व्ही आय पी दर्शन सुविधेचा लाभ घेणाऱ्या वय वर्ष १० वर्षाच्या आतील वयोगटातील भाविकांना सदरचा पास मात्र निशुल्क असेल. मात्र सदर सशुल्क व्ही आप पी दर्शन पास हे विश्वस्त संस्थेच्या मुख्य कार्यालयात, उपकार्यालयात सकाळी ९.०० ते ६.०० वाजे दरम्यान भाविकांना उपलब्ध होणार असून सशुल्क व्ही आय पी दर्शन पासच्या माध्यमातून भाविकांना जलद श्री भगवती दर्शन सुविधेची संधी उपलब्ध होणार आहे.

त्याच बरोबर सप्तशृंग गडावरील स्थानिक ग्रामस्थांना आधार कार्ड तपासून मोफत दर्शन सुविधा देण्याचे योजिले आहे अशी माहिती विश्वस्त संस्थे मार्फत देण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT