नाशिक : (वाखारवाडी) ज्या बैल जोडीच्या मदतीने शेतीचा भार वाहिला, तीच बैलजोडी विहीरातील पाण्यात डोळ्यादेखत बुडून मरताना पाहण्याचा प्रसंग एका शेतकऱ्यावर आला. ही दुर्दैवी घटना देवळा तालुक्यातील वाखारवाडी येथे घडली.
अशी आहे घटना
पोपट निकम मालेगाव रस्त्याला जनार्दन स्वामी महाराज कुटियाजवळ वस्ती करून राहतात. अचानक आवाज आल्याने बैल बिथरले आणि एकाबरोबर दुसराही ओढला गेल्याने दोन्ही बैल विहिरीत पडले. इतर शेतकऱ्यांना बोलावत ट्रॅक्टरच्या सहाय्याने बैलांना वर काढले. जवळपास एक लाखापेक्षा जास्त किंमतीची बैलजोडीची अशी अवस्था झाल्याने मालकाच्या डोळ्यांत अश्रू आले. शेती व बैलांच्या मदतीने मजुरी करून उपजीविका करणारे श्री. निकम संबंधित घटनेने हतबल झाले आहेत. आधीच कोरोनामुळे शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी काकुळतीला आला आहे. त्यात हा असा "दुष्काळात तेरावा महिना' झाल्याने सगळेच अवघड झाले आहे. डॉ. खारगे यांनी मृत बैलाचे विच्छेदन केले. नुकसानीची दखल घेत मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणारी घटना..अखेर सुटलाच 'त्या' मजुरांचा धीर.. रोजच्या मरणातून सोडवला जीव एकदाचा
जिवा-शिवाच्या जोडीवर माझा संसार सुरू होता. त्यांची अशी अवस्था झाल्याने आता पुढे काय, असा प्रश्न उभा राहिला आहे. आधीच कोरोनाने आमचे कंबरडे मोडले आहे. त्यात हे संकट. शेतकऱ्यांच्याच नशिबी अशी संकटांची मालिका का? - पोपट निकम, वाखारवाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.