Palakhed dam illuminated by electric lighting Nashik News esakal
नाशिक

अभियंत्याची भन्नाट कल्पना; विद्युत रोषणाईने उजळले पालखेड धरण

योगेश मेधणे

चिंचखेड (जि. नाशिक) : दिंडोरी तालुका (Dindori) हा धरणाचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यातील पालखेड धरण (Palakhed Dam) शाखा अभियंता (Engineer) सुदर्शन सानप यांच्या संकल्पनेतून आकर्षक रोषणाईने उजळून निघाले असून, नागरिकांची बघण्यासाठी गर्दी होत असून, धरण बघून नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.

कादवा नदीवर असलेल्या पालखेड धरणाची उंची ३४.७५ मीटर (११४.० फूट) आहे, तर लांबी ४.११० मीटर (१३, ४८० फूट) आहे. क्षमता ६५३ क्यूसेक आहे. सध्या धरणात ५५ टक्के पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात पालखेड धरणास महत्त्वाचे स्थान असून, दिंडोरी, निफाड, येवला, चांदवड, नांदगाव आदी तालुक्यांतील गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाणीपुरवठा केला जातो. धरणावर येवला तालुका, मनमाड शहर व ४४ गावांसह ओझर, चिंचखेड, जोपूळ, लोखंडेवाडी, साकोरे, मोहाडी, जानोरी, जऊळ्के दिंडोरी, पाचगाव पाणीपुरवठा योजना, पिंपळगाव बसवंत, पालखेड बंधारा, कोराटे, खडक सुकेणे, अक्राळे, राजारामनगर, कादवा कारखाना, एमआयडीसी पालखेड, एमआयडीसी अक्राळे या पाणीयोजना अवलंबून आहेत. पालखेड धरणावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आरक्षणाचे पिण्याचे पाणी कादवा नदीपात्रात सोडले आहे. रात्री रोषणाईचे मनमोहक दृश्‍य बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gauri Garje Case : गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात धक्कादायक दावा ! दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग सापडताच नवऱ्याने स्वत:वर ब्लेडने वार केले अन्...

Crime News : चाकूचा धाक दाखवत अपहरण केलं, नंतर सोशल मीडियावर VIDEO व्हायरल केला; लेडी गँगची दहशत समोर...

Latest Marathi News Live Update : स्मृती मानधनाच्या लग्नातच विघ्न...नातेवाईकाला अचानक हार्ट अटॅक; सोहळा रद्द होण्याची चर्चा

Delhi Car Blast Case: ‘अल फलाह’चे दहशतवादी कनेक्शन; साखळी बाँबस्फोटांतील आरोपी हा माजी विद्यार्थी

Washim News : 'तू खूप सुंदर दिसतो, तू खूप गोड आहे' म्हणत जवळ घेतलं अन्...; शिक्षकाकडून विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT