A shed in the park behind the Marathi school in Soygaon is a hangout for drunkards.
A shed in the park behind the Marathi school in Soygaon is a hangout for drunkards. esakal
नाशिक

Nashik: उद्यान- जलकुंभ बनला मद्यपींचा अड्डा! सोयगाव गावठाणातील नागरिकांची वाढली डोकेदुखी, मनपा-पोलिसांचे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : शहरातील अमली पदार्थांचा वाढता वापर शांतता, कायदा सुव्यवस्थेसाठी घातक ठरत आहे. शहराजवळील सोयगाव हे व्यसन, अमली पदार्थांपासून दूर होते.

सध्या गावात नशेखोर, मद्यपी, रोमिओंची वाढती संख्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. नागरिकांमधून याबाबत चिंता व्यक्त केली जात असून सोयगाव गावठाणमधील मुख्य जलकुंभ व जिल्हा परिषद शाळेमागील उद्यानातील शेड हे या मद्यपींची अड्डा बनला आहे.

याकडे महापालिका आणि पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. संबंधितांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Park Jalakumbh become place for alcoholics Citizens of Soygaon village increased headache due to neglect of municipality police Nashik)

येथील जलकुंभावर बसून गांजा ओढणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दारूप्राशन करणारे नशेत असताना एखादी दुर्घटना अथवा मारामारीचे प्रसंग उद्भवू शकतो. प्रसंगी पाणी दूषित करू शकतात.

जलकुंभासह गावातील मराठी शाळेमागील उद्यानाच्या शेडमध्ये व परिसरात हे मद्यपींचा चोवीस तास वावर असतो. उद्यानात अनेकदा शेडमध्ये रिकामे सिरींज (इंजेक्शन) आढळून आले आहेत. शेडमध्ये जलकुंभ देखरेख करणाऱ्यांना शिवीगाळ करणारा मजकूर लिहिलेला आहे.

पोलिस प्रशासनाने ही बाब लक्षात घेऊन कारवाई करावी. उद्यान निर्मितीमागे परिसरातील नागरिकांच्या व्यायामासाठी, परिसरातील मुलांच्या खेळण्यासाठी उत्तम सोय व्हावी हा उद्देश होता. मात्र तो साफ अपयशी ठरत आहे.

किमान या दोन्ही ठिकाणी सीसीटीव्ही लावावेत. नशेखोरांमुळे सोयगावची होत असलेली वाताहत हा चिंतेचा विषय असून पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सोयगावातील गुन्हेगारी व नशेखोरी वाढण्यास अप्रत्यक्षपणे मदतच मिळत आहे. शिवाय गावातील इतर मुले यामुळे व्यसनाधीन होण्याची शक्यता वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT