saptshrungi mata esakal
नाशिक

दिवाळी सुट्टयांच्या कालावधीत सप्तशृंगी देवीचे पासद्वारे दर्शन

दिगंबर पाटोळे

वणी (जि. नाशिक) : आद्यशक्तिपीठ सप्तशृंगी गडावर आदिमायेच्या दर्शनासाठी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता प्रशासनातर्फे ६ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान दर्शनासाठी ऑनलाईन दर्शन पास अनिर्वाय करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सव काळात भाविकांची गर्दी लक्षात घेता प्रशासनाने ऑनलाईन दर्शन पास भाविकांना दर्शनासाठी अनिर्वाय करण्यात आले होते. दरवर्षी दिवाळी संपताच वणी गडावर भाविक व पर्यटक देव दर्शनासह पर्यटनासाठी सप्तशृंग गडास प्राधान्य देतात, त्यामूळे या कालावधीत भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, कोविड (Covid) नियमानुसार गर्दीचे नियोजन होणेकामी शासनाने निर्धारीत केलेल्या आदेशानूसार सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने आपल्या www.saptashrungi.net किंवा www.ssndtonline.org/services/?p=registration या संकेतस्थळावरून ई- दर्शन पास उपलब्ध करुन दिले आहे.

दर्शन पास अनिवार्य

आदिमायेचे मंदिर पहाटे ५.०० ते रात्री ९.०० वाजे दरम्यान भाविकांना दर्शनासाठी खुले राहाणार असून प्रतितास ९०० भाविकांना श्री भगवती दर्शनाची उपलब्धता असणार आहे. तसेच ऑफलाईन दर्शन पास माध्यमातून प्रतिदिन प्रतितास १०० प्रमाणे श्री भगवती दर्शनाची उपलब्धता भाविकांसाठी असणार असून सदरचे पास उपकार्यालय व ट्रस्ट मालवाहू रोपवे येथिल इमारत जागेत उपलब्ध असेल. दर्शनार्थी भाविकांनी ऑनलाईन /ऑफलाईन पासवर निर्धारीत करून दिलेल्या वेळेच्या (स्लॉट) किमान अर्घातास अगोदर मौजे सप्तशृंगगड येथे दर्शन रांग (प्रवेशद्वार/फ्युनिक्युलर रोपवे प्रकल्प) येथे उपस्थित राहणे आवश्यक आहे. श्री भगवतीचा ऑनलाईन दर्शन पास हा प्रवेशद्वारावर दाखविणे अनिवार्य असेल.

दर्शनार्थी भाविकाचे वय किमान १० वर्षापेक्षा अधिक व वय वर्षे ६५ पेक्षा कमी असणे शासकीय नियमानुसार आवश्यक आहे. दर्शनार्थी भाविकाचे कोविंड-१९ संदर्भिय लसीकरणाची दोन्ही डोस पुर्ण असणे आवश्यक आहे. दर्शनार्थी भाविकांना कोविड- १९ नियमानुसार मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे तसेच सोशल डिस्टंसिंग पाळणे व थर्मल स्कॅनिंग संदर्भिय पुर्तता करणे बंधनकारक आहे. ऑनलाईन दर्शन पास संबंधीत तांत्रीक अडचण उदभवल्यास श्री. प्रशांत दामरे (संपर्क क्र. ९४२२१०१११८ किंवा ९२२४३४६६०९) यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: मद्यपाशातून मुक्तीसाठी ५० रुग्णालयांत जनजागृती स्टॉल

टॉप थ्री वगळून ४ ते ६ नंबरच्या न्यायाधीशांची शिफारस; सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने घेतलेल्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयआयटीत मृत्यूचे सावट! २० वर्षांत १७१ विद्यार्थ्यांची आत्महत्या, धक्कादायक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT