Manmad Railway Station Sakal
नाशिक

प्रवाशांना यंदाही आरक्षण करूनच करावा लागतोय रेल्वे प्रवास

अमोल खरे

मनमाड (जि. नाशिक) : गेल्या वर्षभरापासून बंद असलेली मध्य रेल्वेची जनरल तिकीट सेवा अद्यापही सुरू न झाल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीमुळे जाणाऱ्या - येणाऱ्या गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे. यंदा जनरल तिकीट नसल्याने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. आरक्षण तिकीटासाठी गर्दी होत असल्याने कन्फर्म तिकीट मिळणेदेखील मुश्किल होत असल्याने झगडावे लागत आहे.

कोरोना संसर्ग आटोक्यात आला असला तरी रेल्वे मंत्रालयाने अद्यापही रेल्वे गाड्या नियमितपणे सुरू केलेल्या नाहीत. त्यामुळे सध्या केवळ विशेष गाड्याच धावत आहे. त्यातच आरक्षण तिकीट काढून आरक्षण केल्याशिवाय प्रवाशांना प्रवास करता येत नाही. या विशेष गाड्यांना अद्यापही जनरल डबे जोडण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना आरक्षण तिकीटाच्या जादा दरामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. सध्या दीवाळी सणाचे दिवस असल्यामुळे कामानिमित्त तसेच, इतर कारणांसाठी बाहेरगावी असलेल्या लोकांची आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दी होत आहे. परंतु, आरक्षण केल्याशिवाय प्रवास करता येत नसल्याने आणि जनरल डब्बे जोडले नसल्याने सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागत आहे. तर, आरक्षण तिकीटासाठी गर्दी होत असल्याने कन्फर्म तिकीट मिळणेदेखील मुश्किल होत आहे. त्यामुळे अनेकांना वेटिंगवर राहण्याची वेळ आली आहे.

सर्वसामान्यांचा प्रवास सुखदायक व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासनाने किमान सणासुदीच्या दिवसात तरी रेल्वे गाड्यांना जनरल डबे जोडून त्या नियमित सुरू करून जनरल तिकीट देण्याची मागणी होत आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असताना विशेष गाड्या नियमित करून तिकीट दर कमी केलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना भुर्दंड बसत आहे.

खासगी प्रवासही महागला

रेल्वेशिवाय प्रवासासाठी उपलब्ध असलेले अन्य पर्याय तुलनेने महाग आहेत. त्यामुळे रेल्वेचे आरक्षित तिकीट न मिळाल्यास नागरिकांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे खासगी ट्रॅव्हल्सचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे खासगी प्रवास सर्वांना परवडणे शक्य नाही.

तिकीट अर्जासाठी जादा पैशांची आकारणी

कामानिमित्त व इतर कारणांसाठी बाहेरगावी असलेल्या लोकांची गावी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गर्दी होत आहे. दिवाळीच्या काळात कन्फर्म तिकीट मिळणे मुश्किल असते. त्यात जनरल तिकीट बंद असल्याने नागरिकांना प्रवासासाठी कसरत करावी लागते. तर आरक्षण फॉर्म भरावा लागत असल्याने अनेकांना अडचण निर्माण होते. अनेक जण अशिक्षित असल्याने फॉर्म भरण्यासाठी इतरांकडे विनवण्या कराव्या लागतात. तर अनेक जण फॉर्म भरण्याचे वेगळे पैसे घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT